गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग; घर घेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:17 AM2021-07-25T04:17:14+5:302021-07-25T04:17:14+5:30

गावापासून दूर घरे स्वस्त, पण जाणे-येणे महाग अकोला शहरात घरांच्या किमती वाढत चालल्या आहेत. फ्लॅटच्या किमतीही ३०-३५ लाखांच्या वर ...

Home loans are cheap, but construction materials are expensive; When will the dream of owning a house come true? | गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग; घर घेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार?

गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग; घर घेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार?

Next

गावापासून दूर घरे स्वस्त, पण जाणे-येणे महाग

अकोला शहरात घरांच्या किमती वाढत चालल्या आहेत. फ्लॅटच्या किमतीही ३०-३५ लाखांच्या वर पोहोचल्या आहेत.

शहरातील मलकापूर, खडकी या भागात फ्लॅट व घरांच्या किमती काही प्रमाणात कमी आहेत.

मात्र हा परिसर शहराच्या मध्य भागापासून दूर पडतो. कोणत्याही कामासाठी मुख्य बाजारपेठेत ये-जा करायचे असल्याच ६-७ किमीचे अंतर पार करावे लागते.

असे आहेत गृहकर्ज दर

स्टेट बँक ऑफ इंडिया ६.७५

बँक ऑफ इंडिया ७.५०

बँक ऑफ महाराष्ट्र ७.०५-७.५०

एचडीएफसी ६.७५-७.२५

आयसीआयसीआय ६.७५

बांधकाम साहित्यांत स्वस्ताई नाहीच!

साहित्य २०१८ २०१९ २०२० २०२१(जुलै)

सिमेंट २६० २७० २८० ३२५

विटा ३६०० ४२०० ४८०० ५१००

वाळू ८००० ८८०० १०००० १२०००

खडी ४३०० ४८०० ५२०० ५३५०

स्टील ३४०० ३९०० ४२०० ५४००

साहित्य विक्रेते म्हणतात

दरवर्षी मागणी वाढल्यावर बांधकाम साहित्याच्या किमती वाढतात. यंदाही सिमेंट, स्टीलच्या किमती वाढल्या आहेत. दिवाळीनंतर दर कमी होण्याची शक्यता आहे.

- नयन गुप्ता

लॉकडाऊनमध्ये साहित्य मिळत नसल्याने बहुतांश नागरिकांनी घर बांधकाम रद्द केले होते. आता निर्बंध शिथिल झाल्याने काही प्रमाणात घरांचे काम सुरू झाले आहे.

- विशाल वोरा

घर घेणे कठीणच

कोरोनाकाळात व्यवसाय बंद असल्याने आर्थिक अडचणी वाढल्या. त्यामुळे घर घेण्याचे स्वप्न लांबले आहे. साहित्यही महागले आहे.

- दीपक शेळके

सद्य:स्थितीत बांधकाम साहित्य महागले आहे. दिवाळीनंतर काही प्रमाणात दर कमी झाल्यास घर बांधकामाचा विचार करणार आहे.

- अमोल जैन

Web Title: Home loans are cheap, but construction materials are expensive; When will the dream of owning a house come true?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.