गृह राज्यमंत्री डॉ,. रणजीत पाटील यांनी केली सांगली जिल्ह्यात पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 08:23 PM2019-08-12T20:23:59+5:302019-08-12T20:26:58+5:30
डॉ . रणजित पाटील यांनी सोमवारी सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांमध्ये जाउन तेथील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली.
अकोला : राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सोमवारी सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांमध्ये जाउन तेथील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली. सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बाधित झालेल्या गावांतील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी स्वच्छता व आरोग्य विषयक समुचित उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे. आलेल्या प्रचंड महापुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून या पूरग्रस्तांसाठी सर्व स्तरातून मदतीचे ओघ येत आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुरामुळे सांगली परिसरात साथीचे आजार त्वचेचे आजार बळावण्याची दाट शक्यता लक्षात घेता स्वतः डॉक्टर असलेले राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील या पूरग्रस्तांसाठी आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी ८ तज्ञ डॉक्टरांसह, ४ फार्मासिस्ट, ४ सामाजिक कार्यकर्ते, ४ पॅरामेडिक्स असिस्टेंट व इतर असे २५ सदस्यांचे वैद्यकीय मदत पथक, सोबत २ एम्बुलेंस दहा हजार पूरग्रस्तांना पुरेल एवढा औषध साठा घेऊन सांगली मध्ये दाखल झाले. आज सकाळपासून सांगली जिल्ह्यातील भिलवडी ता. पलुस मधील माळवाड़ी,उमाजी नगर, लक्ष्मी चौक, अशा अनेक गावागावात जाऊन डॉ. पाटील यांनी रुग्णांची तपासणी करून शासन आपल्या पाठीशी आहे अशी ग्वाही उपस्थित नागरिकांना दिली. गावातली अवस्था बिकट असून सगळीकडे चिखलाचे साम्राज्य आहे अशा चिखलातून डॉ. रणजीत पाटील मोटर सायकल वरून गावातील घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करताना दिसले स्वतः मंत्रीमहोदय आल्यामुळे तेथील आरोग्य तपासणी कक्षातील डॉक्टर लगबगीने काम करताना दिसून आले .औषधाचा साठा किती आहे आणि येत्या काळामध्ये कोणती औषधे लागू शकतात आणि स्थानिकांना दिलासा देण्याचे काम डॉक्टर रणजीत पाटील यांनी केले. निसर्ग कोपला असला तरीही घाबरून न जाता आम्ही आपल्या सोबत आहोत आपल्या सदैव मदतीला आहोत असा दिलासा डॉ. रणजीत पाटील यांनी ग्रामस्थांना दिला तसेच औषधां सोबतच गावातील लोकांना ब्लँकेट, चादरी देण्यात आल्या. यावेळी डॉ. रणजीत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. अशोक ओळंबे ,हरीश चंदानी, डॉ. कैलास अवसरे, डॉ.नरेश बजाज, संजय तिकडे ,आठवले साहेब, प्रकाश पवार ,दीपक रोहित नलावडे, अनु सौदागर निलेश जाधव, यांचे सह अनेक डॉक्टर्स व फार्मासिस्ट यावेळी उपस्थित होते.