कौमी एकता चषकाची गृहमंत्र्यांनी घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:44 AM2020-12-17T04:44:19+5:302020-12-17T04:44:19+5:30

शहरात जातीय सलोखा कायम राहावा, शांतता नांदावी, सामाजिक एकोपा कायम राहावा, सर्व धर्मांमध्ये बंधुभाव कायम राहावा आणि पोलीस व ...

Home Minister takes notice of National Unity Cup | कौमी एकता चषकाची गृहमंत्र्यांनी घेतली दखल

कौमी एकता चषकाची गृहमंत्र्यांनी घेतली दखल

Next

शहरात जातीय सलोखा कायम राहावा, शांतता नांदावी, सामाजिक एकोपा कायम राहावा, सर्व धर्मांमध्ये बंधुभाव कायम राहावा आणि पोलीस व जनतेमध्ये सुसंवाद असावा यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पोलीस आणि सर्व धर्मीय बांधव यांची क्रिकेट टीम बनवून कौमी एकता चषकाअंतर्गत क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी कॅप्टन व पाच पोलीस अंमलदार खेडाळूंची भूमिका बजावत आहेत. इतर सहा खेडाळूंमध्ये सर्व जाती-धर्माच्या बांधवांचा समावेश आहे. या स्पर्धेमुळे पोलीस व जनतेत संबंध दृढ होतील व सामाजिक एकोपा कायम राहून आपसात बंधुभाव वाढेल या संकल्पनेतून कौमी एकता चषकास शास्त्री स्टेडियम येथे सुरुवात झाली. या स्पर्धेत एकूण २६ संघ सहभागी झाले असून, यामध्ये सर्व जातीधर्माचे नागरिक एकोपा व बंधुभावाने खेळत आहे, जिल्हा पोलीस प्रशासनाच्या या कार्याची दखल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे.

Web Title: Home Minister takes notice of National Unity Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.