हाेम क्वारंटीन रुग्णांच्या घरावर लावणार लाल रंगाचे चिन्हं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 11:12 AM2021-03-18T11:12:49+5:302021-03-18T11:13:13+5:30

Akola News संबंधित रुग्णांच्या घरावर लाल रंगाचे गुणाकार चिन्हं लावणे बंधनकारक करण्याचे निर्देश मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी दिले आहेत

Home quarantine patient's house with red marks | हाेम क्वारंटीन रुग्णांच्या घरावर लावणार लाल रंगाचे चिन्हं

हाेम क्वारंटीन रुग्णांच्या घरावर लावणार लाल रंगाचे चिन्हं

Next

अकाेला: संसर्गजन्य काेराेनामुळे नागरिकांचे मृत्यू हाेत असले तरीही अकाेलेकरांना या साथराेगाचे कवडिचेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. काेराेनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या हायरिस्कमधील रुग्णांना हाेम क्वारंटीनसाठी महापालिकेने परवानगी दिली आहे. यादरम्यान, काेराेनाचा प्रसार टाळण्यासाठी संबंधित रुग्णांच्या घरावर लाल रंगाचे गुणाकार चिन्हं लावणे बंधनकारक करण्याचे निर्देश मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी दिले आहेत.

महापालिका क्षेत्रात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेची बाब ठरत आहे. दुकाने खुली करण्यासाठी परवानगी हवी असेल तर जिल्हाप्रशासनाने काेराेना चाचणी बंधनकारक केली. परिणामी शहरातील व्यापारी, दुकानांमधील कामगारांनी चाचणीसाठी गर्दी केल्याचे चित्र आहे. यादरम्यान, काेराेना सदृश लक्षणे आढळून येणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे महापालिकेच्या चाचणी केंद्रांवर नागरिकांची झुंबड दिसून येत आहे. शहरात दरराेज किमान २०० ते ३०० पेक्षा अधिक रुग्ण काेराेनाबाधित आढळून येत असतानाही अकाेलेकर प्रचंड बेफिकिर असल्याचे चित्र आहे. काेराेनामुळे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या जीवाला धाेका निर्माण हाेऊ शकताे,याची जाणीव असतानाही नागरिक,युवा वर्गाकडून नियमांचे पालन केले जात नसल्याची परिस्थिती आहे. शिवाय काेराेनाचा प्रसार वाढल्याने रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली आहे. वैद्यकीय यंत्रणेवर ताण येत असल्यामुळे काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या तसेच हायरिस्कमधील रुग्णांना हाेम क्वारंटीनसाठी मनपा प्रशासनाने परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा नागरिकांची ओळख पटावी यासाठी संबंधित रुग्णांच्या घरावर लाल रंगाचे गुणाकार चिन्हं लावणे बंधनकारक केले असून तसे निर्देश मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी दिले आहेत.

 

शहरात पुन्हा २२३ पाॅझिटिव्ह

नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीचे परिणाम समाेर येत असून काेराेनाची बाधा हाेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे पुन्हा अहवालाअंती बुधवारी समाेर आले. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून महापालिका क्षेत्रातील तब्बल २२३ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यामुळे मनपाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

 

 

पूर्व,दक्षिण झाेन सर्वात पुढे

शहरात काेराेना बाधीत रुग्णांची सर्वाधिक संख्या पूर्व व दक्षिण झाेनमध्ये वाढल्याचे प्रकर्षाने समाेर येत आहे. आजपर्यंत काेराेनाचे सर्वाधिक बाधित पूर्व व दक्षिण झाेनमध्ये आढळून येत आहेत. बुधवारी देखील पूर्व झोनमध्ये काेराेनाचे ९७ रुग्ण आढळून आले. तसेच पश्चिम झोनमध्ये ६३, उत्‍तर झोनमध्ये १२ व दक्षिण झोनमध्ये ५१ असे एकुण २२३ रुग्ण आढळून आले आहेत.

 

अकाेलेकरांची रॅपिड चाचणीसाठी गर्दीकाेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांनी बुधवारी रॅपिड अॅन्टिजेन चाचणीला प्राधान्य दिले. ८९६ नागरिकांनी रॅपिड चाचणी केली. तसेच ४७४ जणांनी आरटीपीसीआर चाचणी केली.

Web Title: Home quarantine patient's house with red marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.