होमगार्डचे चार महिन्यांचे मानधन थकले; कामही बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:31 AM2021-02-18T04:31:57+5:302021-02-18T04:31:57+5:30

पोलिसांवर कामाचा ताण : १ फेब्रुवारीपासून नियुक्तीही नाही लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : तपासणी यंत्रणेचा भाग सोडला तर अन्य ...

Homeguard's four-month honorarium exhausted; Stop working! | होमगार्डचे चार महिन्यांचे मानधन थकले; कामही बंद !

होमगार्डचे चार महिन्यांचे मानधन थकले; कामही बंद !

Next

पोलिसांवर कामाचा ताण : १ फेब्रुवारीपासून नियुक्तीही नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : तपासणी यंत्रणेचा भाग सोडला तर अन्य कामकाजात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणाऱ्या जिल्ह्यातील होमगार्ड्सचे मानधन गेल्या ४ महिन्यांपासून थकीत आहे. दिनांक १ फेब्रुवारीपासून त्यांचे कामही बंद असल्याने या कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे.

कोणतेही सण, उत्सव, निवडणुकांमध्ये पोलिसांच्या बरोबरीने होमगार्ड कर्मचारी कर्तव्य बजावतो. तपासणी यंत्रणेचा भाग सोडला तर बंदोबस्तावर १२ तासांपेक्षा अधिक पहारा देणाऱ्या जिल्हयातील होमगार्ड्सना मानधनही नियमित मिळणे अपेक्षित आहे. कोरोना काळात जिल्ह्यातील होमगार्ड्सना नियमित काम मिळाले. कोरोनाचा आलेख खाली आल्याने आणि सण, उत्सव, मिरवणुकीवर मर्यादा असल्याने होमगार्ड्सना फारसे काम उरले नाही. कोरोना काळात शासनाकडून होमगार्ड्सच्या कर्तव्याला नियमित मंजुरी दिली जात होती. आता केवळ सण, उत्सव व कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित झाला तरच होमगार्ड्सच्या सेवेला शासनाकडून मंजुरी मिळते. दिनांक १ फेब्रुवारीपासून त्यांच्या सेवेला मंजुरी मिळालेली नाही. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती असून, या दरम्यान दोन, तीन दिवसांसाठी होमगार्ड्सच्या सेवेला मंजुरी मिळणार असून, त्यांना बंदोबस्तासाठी बोलाविण्यात येणार आहे. संपूर्ण वर्षातील काही दिवसच काम मिळत असल्यामुळे अनेकजण पार्टटाईम अन्य व्यवसाय करून कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवत असल्याचे पाहायला मिळते. सण, उत्सव, निवडणुकीदरम्यान कर्तव्य बजावल्यानंतरही जिल्ह्यातील अनेक होमगार्ड्सना अद्याप मानधन मिळालेले नाही.

०००००००००००

शासनाकडून प्राप्त निधीमधून होमगार्डना मानधन अदा केले जाते. होमगार्ड्सच्या सेवेला दरमहा शासनाकडून मंजुरी मिळते. १९ फेब्रुवारीदरम्यान दोन, तीन दिवसांच्या बंदोबस्तासाठी होमगार्ड्सची सेवा घेण्याला मंजुरी मिळालेली आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताच थकीत मानधन देण्यात येईल.

- मोनिका राऊत

जिल्हा समादेशक तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक, अकोला

Web Title: Homeguard's four-month honorarium exhausted; Stop working!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.