घरकुल, मूलभूत सुविधांचा बाेजवारा; वंचितचा हल्लाबाेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:24 AM2021-08-19T04:24:24+5:302021-08-19T04:24:24+5:30
सत्ताधारी भाजपने गरीब लाभार्थ्यांवर उघड्यावर राहण्याची वेळ आणली आहे. पूरग्रस्तांचे वीज बिल माफ करावे, महिला बचत गटांना कर्ज माफ ...
सत्ताधारी भाजपने गरीब लाभार्थ्यांवर उघड्यावर राहण्याची वेळ आणली आहे. पूरग्रस्तांचे वीज बिल माफ करावे, महिला बचत गटांना कर्ज माफ करून वाढीव अनुदान द्यावे, मनपात कार्यरत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे, मनपाच्या शाळेतून इंग्रजी माध्यमाचे शिक्षण द्यावे, सिमेंट रस्त्यातील भ्रष्टाचारप्रकरणी दाेषींवर कारवाई करावी तसेच नायगाव येथील डंम्पिंग ग्राउंड हटविण्याची मागणी करीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदाेलन छेडण्यात आले हाेते. आंदाेलनात राज्य उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, अरुंधती शिरसाट, प्रमाेद देंडवे, प्रदीप वानखडे, वंदना वासनिक, किरण बाेराखडे, बबलू जगताप, पराग गवई, अंकित गोपनारायण, अमित गोपनारायण, राहुल खंडारे, आकाश गोपनारायण, स्वप्निल वाहुळकर, अजय खंडारे, अजय इंगळे, संतोष शिरसाठ, भारत गोपनारायण, पप्पू थोरात, निखिल गोपनारायण, सुदेश खंडारे, अंकुश तायडे, अभिजित इंगळे, सुमित तायडे, रोशन मोरे, राजीक शेख, इरफान पठाण, मिलिंद कांबळे, निखिल गोपनारायण, हर्षल वानखडे, अक्षय मिसाळ, पवन गोपनारायण, सोनू सोनवणे, विनोद खिल्लारे, सचिन वाकोडे, संकेत शिरसाट, अफसर भाई जावेद, मंगेश गवई ,आकाश अहिरे, रामदास तायडे, रवी पाटील, राष्ट्रपाल सावळे ,धीरज आठवले, अरुण बलखंडे, प्रज्वल ठोंबरे, राहुल इंगळे, सुमेध अंभोरे, राजू गाेपनारायण आदींसह महिला माेठ्या संख्येने उपस्थित हाेत्या.