होमिओपॅथिक डॉक्टरांच्या समस्या विधिमंडळात मांडणार - बाजोरीया
By admin | Published: April 21, 2017 06:46 PM2017-04-21T18:46:17+5:302017-04-21T18:46:17+5:30
विविध समस्या विधिमंडळाच्या माध्यमातून निकाली काढण्याची ग्वाही शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी दिली.
अकोला : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठय़ा संख्येने होमिओपॅथिक डॉक्टर सेवारत आहेत. दुर्गम भागात जाऊन संबंधित डॉक्टर रुग्णसेवा करतात. त्यांना वेळोवेळी निर्माण होणार्या विविध समस्या विधिमंडळाच्या माध्यमातून निकाली काढण्याची ग्वाही शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी दिली.
स्थानिक विश्रामगृह येथे आरोग्य प्रशासन व होमिओपॅथिक डॉक्टरांनी आयोजित केलेल्या बैठकीत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आ. गोपीकिशन बाजोरिया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, डॉ. किशोर मालोकार, डॉ. अशोक ओळंबे, डॉ. चंद्रकांत पनपालिया, डॉ. प्रवीण चौहान तसेच मनपा वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. अशोक ओळंबे, डॉ. चंद्रकांत पनपालिया यांनी होमिओपॅथिक डॉक्टरांना भेडसावणार्या समस्येवर प्रकाशझोत टाकला. अधिकृत पदवी व तत्सम कागदपत्रे असणार्या डॉक्टरांवर कार्यवाही केल्या जाणार नसल्याचे डॉ. राजकुमार चव्हाण यांनी स्पष्ट केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनीदेखील अधिकृत परवानाधारक व उच्च शिक्षित डॉक्टरांवर कार्यवाही केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी अकोला जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स समन्वय समितीचे डॉ. रणजित अपतूरकर, डॉ. अरविंद मस्के, डॉ. प्रशांत सांगळे, डॉ. मंगेश अंबाडकर, डॉ. वसीम इकबाल, डॉ. शशी जाधव, डॉ. प्रवीण गायगोले, डॉ. सचिन देशपांडे, डॉ. अविनाश गिराम, डॉ. चेतन कुकडकर, डॉ. महेश धारस्कर, डॉ. सुरज इप्पर, डॉ. अविनाश देशमुख यांच्यासह शहरी व ग्रामीण भागातील होमिओपॅथिक डॉक्टर्स मोठय़ा संख्येने उपस्थित होते.