वाडी अदमपूर येथील २१४ लाभार्थ्यांची घरे नामंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:22 AM2021-08-22T04:22:43+5:302021-08-22T04:22:43+5:30
तेल्हारा : तालुक्यातील वाडी अदमपूर येथील २१४ लाभार्थ्यांची घरकुले नामंजूर करण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे बुधवार, दि. ...
तेल्हारा : तालुक्यातील वाडी अदमपूर येथील २१४ लाभार्थ्यांची घरकुले नामंजूर करण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे बुधवार, दि. १७ ऑगस्ट रोजी पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे.
ग्रामस्थांना दिलेल्या निवेदनानुसार, घरकुल लाभार्थ्यांना यादी अ, ब, क निकषांवर घरकुले देण्यात आली. ज्यांची घरे कुडाची, मातीची आहेत अशांची घरकुले नामंजूर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. घरकुलांची यादी व शौचालय बांधकामात घोळ झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील मृत व्यक्तीच्या नावाने मंजूर असलेले घरकुल वारसाला वंचित ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशी करून न्यायाची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. निवेदनावर निवृत्ती हिंगणे, महादेव बोरसे, अनिल जाधव, राजेश कोतकर, श्रीकृष्ण घाटोळ, उमेश सोळंके, निवृत्ती वाघ, गजानन नागे, अनुसया कुलट यांच्यासह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.