होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत पार्थ फडकेला सुवर्ण पदक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 02:27 PM2019-03-10T14:27:45+5:302019-03-10T14:28:10+5:30
अकोला: मुंबई विज्ञान शिक्षक संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत माऊंट कारमेल शाळेच्या पार्थ फडके याने सर्वाधिक गुण मिळवून सुवर्ण पदक पटकावले.
अकोला: मुंबई विज्ञान शिक्षक संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत माऊंट कारमेल शाळेच्या पार्थ फडके याने सर्वाधिक गुण मिळवून सुवर्ण पदक पटकावले. इतर अकरा विद्यार्थ्यांनी रजत व कांस्य पदक पटकावले.
मुंबई विज्ञान शिक्षक संघटनेतर्फे १९८१ पासून होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते. यंदा झालेल्या या मानाच्या परीक्षेत पार्थ फडके याने सुवर्ण पदक, अनिश गावंडे याने रजत पदक, कोठारी कॉन्व्हेंटच्या कल्पीत कापसे, होलीक्रॉस कॉन्व्हेंटच्या ध्रुव फुरसुले, पियुष भिवगडे, स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या पुर्वाई पाटील, नचिकेत महल्ले, होलीक्रॉस कॉन्व्हेंटच्या आदित्य साहू, पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या कुलदीप ठाकरे, स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या अमेय राठोड, प्रभात किड्स स्कूलच्या आस्था लोहिया, स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या राजनंदिनी मानधने आदी विद्यार्थ्यांनी रजत व कांस्य पदक प्राप्त केले. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षा होते. दुसऱ्या टप्प्यात पहिल्या परीक्षेतील निवडक विद्यार्थ्यांचा समावेश असतो. यात त्यांची प्रयोग करण्याची क्षमता पाहिली जाते. तिसºया टप्प्यात त्यांच्यातील शास्त्रज्ञाची चिकीत्सक वृत्ती तपासण्यासाठी एक प्रकल्प करावा लागतो. त्याची पडताळणी केल्यानंतर मिळालेल्या गुणांची गोळाबेरीज करून विद्यार्थ्यांना बालवैज्ञानिक ठरविल्या जाते. राष्ट्रीयस्तरावर होणाºया एनटीएसई परीक्षे सुद्धा कोठारी कॉन्व्हेंटच्या रसिका मल हिने राज्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला. विद्यार्थ्यांना कुतूहल संस्कार केंद्रासह डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, शिवाजी महाविद्यालय, रालतो विज्ञान महाविद्यालय, विविध प्रयोगशाळा आणि शैक्षणिक संस्थांचे मार्गदर्शन मिळाले. (प्रतिनिधी)