शेतात काम करणाऱ्या मजुरांवर मधमाशांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 02:08 PM2019-09-29T14:08:54+5:302019-09-29T14:09:22+5:30

एक महिला व दोन पुरुष असे तीन मजूर गंभीर जखमी झाले आहे.

Honey Bee attack on farm laborers in Patur Taluka | शेतात काम करणाऱ्या मजुरांवर मधमाशांचा हल्ला

शेतात काम करणाऱ्या मजुरांवर मधमाशांचा हल्ला

Next

खेट्री : पातुर तालुक्यातील चतारी येथे शेतशिवारात शेत मजूरावर मधमाशांनी अचानक हल्ला केल्याची घटना रविवारी २९ सप्टेंबर रोजीच्या सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.  या घटनेमध्ये महीलासह एकूण १० मजूर जखमी झाले आहे. यापैकी एक महिला व दोन पुरुष असे तीन मजूर गंभीर जखमी झाले आहे. सुकळी येथील महिला व पुरुष मजूर चतारी येथील गणेश रामभाऊ ढोरे यांच्या शेतात मजुरीने काम करण्यासाठी आले होते.  शेतातील झाडाखाली जेवण करण्यासाठी बसले असता, शेजारच्या शेतात कपाशी पिकावर फवारणी सुरू होती. फवारणीचा धूर लागताच झाडाखाली जेवणासाठी बसलेल्या महिलासह मजुरावर मधमाशांनी हल्ला चढवला घाबरलेल्या मजुरांनी आरडाओरडा करून चतारी गावाकडे धाव घेतली चतारी गावकऱ्यांनी माणुसकीचा परिचय देऊन पुढाकार घेऊन रुग्णांना जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले, काही जखमींनी खाजगी रुग्णालयात धाव घेतली ,५ जखमींवर चतारी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
जखमी झालेल्या मजुराचे नाव
गोपाल वासुदेव अंबोरे, सुखदेव भिसे, चित्राबाई जयराम अंबोरे, हे तीन मजूर गंभीर जखमी झाले आहे. तर लिलाबाई वासुदेव अंबोरे, हरीश वासुदेव अंबोरे, सागर बबन वानखडे, रानी बबन वानखडे, अनिता बबन वानखडे, संदीप जाधव, व इतर एक जण असे सात जण जखमी झाले आहे. यापैकी ५ जखमींवर चतारी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. उर्वरित जखमिनी खाजगी रुग्णालयात धाव घेतली आहे.


मधमाशांनी गावापर्यंत केला पाठलाग
मधमाशांनी शेतात मजुरावर हल्ला तर केलाच पण मजुरांनी स्वतःला वाचविण्यासाठी गावाकडे धाव घेतली असता, मधमाशांनी मजुराचा गावापर्यंत पाठलाग करून हल्ला केला त्यामुळे मजुरांची एकच तारांबळ उडाली होती.


मधमाशांनी हल्ला केल्याचे चातारी ग्रामीण रुग्णालयात ५ जखमी रुग्ण आले आहे. त्या सर्वांना भरती करून चतारी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.
- डॉ.असद फहीम, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय,  चतारी

Web Title: Honey Bee attack on farm laborers in Patur Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.