शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान
By admin | Published: April 16, 2017 09:47 PM2017-04-16T21:47:55+5:302017-04-16T21:47:55+5:30
अकोला- महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य भवन प्रांगणात पार पडलेल्या कार्यक्रमात शहिद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला.
प्रबोधन गीतांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अकोला : महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्वावर स्वराज्य भवन प्रांगणात संपन्न झालेल्या प्रबोधन गीत कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात देशासाठी शहीद झालेल्या अकोला जिल्ह्यातील सैनिकांना अभिवादन करण्यात येऊन या शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.
भीमशक्ती युवक संघटन, उमरी व नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात प्रबोधनकार अनिरुद्ध बनकर यांनी आपल्या प्रबोधन गीतांनी कार्यक्रमात जोश निर्माण केला. कार्यक्रमात प्रख्यात गायिका रसिका बोरकर हिचा बनकर यांनी गौरव केला.
आ. बळीराम सिरस्कार, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. बबनराव चौधरी, अविनाश देशमुख, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, बौद्ध महासभेचे अध्यक्ष रवींद्र दारोकार, राजाभाऊ लबडे, जि. प. उपाध्यक्ष जमीरउल्ला पठाण, मीना राऊत, वामन सोमकुंवर, संयोजक जीवन डिगे, आनंद पिंटू वानखडे आदींच्या उपस्थितीत शहिदांच्या कुटुंबीयांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत प्रधान, निशांत जाधव, देवीलाल तायडे, राजेश वानखडे, रमेश वानखडे, जयेश खोडके, मनीष कांबळे, अविनाश मोरे, संतोष खंडारे, देवेंद्र भगत, सुबोध वेले, प्रदीप वरठे, प्रमोद मुलडकर, प्रमोद बनसोडसमवेत भीमशक्ती युवक संघटन व नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.