वकिलीसोबतच समाजकारण करणाऱ्या महिला विधिज्ञांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 01:58 PM2019-03-30T13:58:35+5:302019-03-30T13:59:59+5:30
अकोला: अकोला बार असोसिएशनच्या महिला विधिज्ञ सदस्यांच्या वतीने वकिली व्यवसायासोबतच समाजकारण करणाऱ्या कर्तबगार महिला विधिज्ञांचा शुक्रवारी सन्मान करण्यात आला.
अकोला: अकोला बार असोसिएशनच्या महिला विधिज्ञ सदस्यांच्या वतीने वकिली व्यवसायासोबतच समाजकारण करणाऱ्या कर्तबगार महिला विधिज्ञांचा शुक्रवारी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ फौजदारी विधिज्ञ अर्चना गावंडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून अकोला बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष अॅड़ मुमताज देशमुख, महिला प्रतिनिधी अॅड़ सुनीता कपिले, अॅड़ जयश्री देशपांडे, अॅड़ उमा रघुवंशी, अॅड़ प्रेमा गुप्ता, अॅड़ विद्या मानकर, अॅड़ ममता तिवारी उपस्थित होत्या.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्ती अॅड़ सारिका गिरणीकर, अॅड़ माधवी रत्नपारखी, अॅड़ प्रेमा गुप्ता, अॅड़ मनीषा धूत, अॅड़ भारती रुंगटा, अॅड़ नीलिमा शिंगणे, अॅड़ नंदिता चौधरी, अॅड़ छाया लढ्ढा यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच एलएल.एम. पदवी परीक्षेत गुणवंत ठरलेल्या अॅड़ सुजाता सोनोने आणि अॅड़ आम्रपाली गोपनारायण यांनादेखील गौरविण्यात आले. यावेळी अॅड़ गावंडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात, वकिली व्यवसाय करीत असताना आपल्याकडे येणारे प्रकरण, मग ते फौजदारी असो की दिवाणी, त्याकडे सामाजिक बांधीलकी म्हणून बघितल्या गेले पाहिजे. आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलो, तरी सामाजिक बांधीलकी जपणे आवश्यक आहे. सामाजिक कर्तव्य म्हणून करणे गरजेचे आहे. आपल्या व्यवसायातील ज्ञान आपल्याला अवगत असल्याने त्याचा समाजासाठी उपयोग करणे सहज शक्य असते, असे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समायोचित भाषण केली. सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन अॅड़ आम्रपाली गोपनारायण यांनी केले. कार्यक्रमाला अॅड़ संगीता कोंडाणे, अॅड़ भक्ती ठकार, अॅड़ वर्षा रामटेके, अॅड़ संगीता गावंडे, अॅड़ श्वेता बाळापुरे, अॅड़ रू पाली मिश्रा, अॅड़ आरती गांधी, अॅड़ प्रिन्सी जैन आदी महिला विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.