कोरोना योद्ध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:13 AM2021-04-29T04:13:59+5:302021-04-29T04:13:59+5:30
फाेटाे आहे ............................. न्यू तापडियानगरात पोलीस चौकी उभारा अकोला.- सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ३ ...
फाेटाे आहे
.............................
न्यू तापडियानगरात पोलीस चौकी उभारा
अकोला.- सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ३ मधील न्यू तापडियानगर, खरप, पंचशीलनगर व दुबेवाडी या परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, या परिसरातील कायमस्वरूपी स्वतंत्र पोलीस चौकी उभारण्याची मागणी आधार फाउंडेशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना करण्यात आली. आधार फाउंडेशनचे अध्यक्ष माणिक शेळके, राहुल ठाकूर, किशोर ठाकरे, गौरव पांडे, गोविंद सूर्यवंशी, सुशील ठाकरे यांनी यासंदर्भात निवेदन दिले.
..............................................
लसीकरण केंद्रावरील गैरसाेय थांबवा
अकाेला : लसीकरण केंद्रावर प्रत्येक दिवशीचे किती डोस उपलब्ध आहेत ते प्रत्येक केंद्रावरील फलकावर प्रसिद्ध करावे. जेणेकरून तेव्हढेच लोक केंद्रावर उपस्थित राहतील व केंद्रावर गर्दी होणार नाही. तसेच प्रत्येक केंद्रावर नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व सावलीची व्यवस्था करावी. अशी मागणी ऊर्जा पर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय पाटील-तिकांडे, सरचिटणीस राहुल इंगळे, मोर्शी तालुका अध्यक्ष शुभम ढोले, शुभम बोंडगावकर, सुनील जाधव, श्रीकृष्ण तायडे, गजानन इचे, हेमंत ताले, अरुण कावस्कर, श्रीकृष्ण सावदेकर, यश देशमुख, अमोल कोल्हे, गणेश सांगडे आदींनी केली आहे.
................................................................
सेव्ह मेरीट सेव्ह नेशनची शासनाला नोटीस
अकोला-शासकीय सेवांमधील आरक्षण २००१ हा कायदा राज्यामध्ये २००४ पासून लागू करण्यात आला आहे. नंतर या कायद्याच्या जोडीला महाराष्ट्र शासनाने २५ मे २००४ रोजी शासन निर्णय काढून पदोन्नतीमध्ये आरक्षण दिले. या अन्यायकारी शासन निर्णयाला सेव्ह मेरीट सेव्ह नेशनने विरोध दर्शवित मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देत हा निर्णय रद्द करण्यासाठी शासनाला नोटीस दिली आहे.
..................................
‘लॉकडाऊन’मध्ये रस्त्यांवर गर्दी
अकोला- : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कडक निर्बंध करण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील परिसरातील रस्त्यांवर नागरिक गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. अत्यावश्यक कामांशिवाय नागरिकांनी बाहेर न पडता घरातच थांबण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.
.............
वीज ग्राहकांना पाठविता येणार रीडिंग
अकाेला : कोरोना संसर्गामुळे अनेक ठिकाणी महावितरणला मीटर रीडिंग घेणे शक्य न झाल्यास वीज ग्राहकांनाच ते पाठविता येईल. महावितरणचे अॅप किंवा वेबसाइटद्वारे मीटर रीडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
...................
उपायांची काटेकोर अंमलबजावणी करा
अकाेला : ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व गटविकास अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या आहेत.
.....................
आरटीई प्रवेशासाठी संकेतस्थळावर मिळणार सूचना
अकाेला : आरटीई प्रवेशासाठी यंदा राज्यस्तरावरून ऑनलाईन सोडत काढण्यात आल्यानंतर १५ एप्रिलपासून एसएमएसद्वारे प्रवेशाची माहिती उपलब्ध झाली असली तरी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. आरटीई प्रवेशासाठी संकेत स्थळावर सूचना मिळणार आहे.
..............................
मजूर, कामगारांवर उपासमारीची पाळी
अकोला- : लॉकडाऊनकाळात कामधंदे बंद असल्याने मजूर, कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. घरखर्च कसा भागवावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. त्यांना मदतीची गरज आहे.
....................
लग्न समारंभाशी निगडित व्यवसायांवर गदा!
अकोला-: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे लग्न समारंभांनाही फटका बसला असून, निगडित व्यवसायांवर गदा आली आहे. मंडप डेकोरेशन, मंगल कार्यालय, फोटोग्राफी, केटरिंग, फूल व्यवसाय, वाजंत्रीवाले यांची ऐन सिझनमध्ये कमाई थांबल्याने मोठा आर्थिक फटका बसला.
................
शहरात खरबुजाची वाढली आवक
अकाेला : शहरातील विविध मार्गांवर खरबूज मोठ्या प्रमाणात विक्रीस आले आहेत. त्यामुळे ग्राहकही मोठ्या आवडीने खरबूज खरेदी करताना दिसून येत आहेत.
................
नेटवर्कअभावी नागरिक झाले त्रस्त
बाेरगाव मंजूर : विविध शासकीय कार्यालयातील कामकाजासह खासगी कंपन्यांची कार्यालयीन कामे ऑनलाइन सुरू झाली आहेत. त्यामुळे मोबाइलचा वापरही वाढला आहे. मात्र, आता नेटवर्कअभावी नागरिक त्रस्त झाले आहेत.
................
लसीकरण केंद्रांवर वाढती गर्दी
अकाेला : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी वाढत आहे. मात्र, लसीचा साठा कमी असल्याने अनेकांना लसीविनाच परत जावे लागत आहे.
...................
बांधावरच मिळणार खते व बियाणे
अकाेला : खरीप हंगाम २०२१ साठी शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे बांधावरच खते, बियाणे गावातील शेतकरी गटामार्फतच देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता बांधावरच खते, बियाणे मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
.................................