हुक्का पार्टीतील शिक्षकांवर कारवाई करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:29 AM2017-09-19T00:29:00+5:302017-09-19T00:29:06+5:30
अकोला : हुक्का पार्लरमध्ये नशा करणार्या शिक्षकांवर पोलीस कारवाई झाली, त्या सर्वांना तातडीने निलंबित करा, अशी मागणी शिक्षण समितीच्या सभेत सर्व सदस्यांनी केली. त्यावर सभापती पुंडलिकराव अरबट यांनी कारवाई करण्याचा आदेश शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना दिला. विशेष म्हणजे, शिक्षकांवर कारवाई होत नसल्याचे वृत्त सोमवारीच ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले.
लोकमत न्यूज नेटवर्क

शिक्षण समितीच्या सभेत सदस्य अक्षय लहाने, संतोष वाकोडे, प्रतिभा अवचार, ज्योत्स्ना चोरे, शबाना खातून, अनिता आखरे उपस्थित होत्या. कानशिवणी गटातील शिक्षक चर्हाटे शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना वरलीचे आकडे लावण्यासाठी पाठवतात. त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याची मागणी सदस्या प्रतिभा अवचार यांनी लावून धरली. त्यानुसार कारवाई करण्याचे अधिकार्यांनी सांगितले. यावेळी विजय हरणे यांनी मागील सभेत उपस्थित केलेल्या मुद्यांवर चौकशी करून तातडीने कारवाई केली जाणार आहे. खेट्री येथील जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापकाचा प्रभार सहायक अध्यापिका सोनचळ यांच्याकडे आहे, त्यांना इतर अध्यापक सहकार्य करत नाहीत, त्या शिक्षकांची इतरत्र प्रतिनियुक्ती करा, असा आदेश सभापती अरबट यांनी दिला. सोबतच मळसूर येथील शाळेत चार विद्यार्थी असल्याने ती शाळा समायोजित करण्याचे सांगण्यात आले.
पोषण आहार अधीक्षक मालवे यांच्यावर कारवाई
अकोटचे पोषण आहार अधीक्षक संदीप मालवे गेल्या अनेक महिन्यांपासून माहिती देत नाहीत, सभेला उपस्थित राहत नाहीत, त्यांच्या तीन वेतनवाढी रोखण्याची कारवाई करा, असा आदेशही सभापती अरबट यांनी दिला.