‘कोरोना ’ची धास्ती : बाजारात शेतमालाची आवक घसरली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 02:15 PM2020-03-17T14:15:19+5:302020-03-17T14:15:24+5:30
बाजार समितीमध्ये २ हजार क्विंटल तूर व ४ हजार क्विंटल हरभºयाची आवक झाली.
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाची धास्ती सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची वर्दळ कमी झाली झाली असून, बाजारात शेतमालाची आवकही घसरली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीचे वातावरण सध्या सर्वत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे नागरिकांकडून टाळले जात आहे. त्यामध्ये नेहमीच्या तुलनेत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकºयांची वर्दळ कमी झाली असून, बाजार समितीमध्ये तूर, हरभरा, गहू इत्यादी शेतमालाची आवक कमी झाल्याचे चित्र अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी दिसत होते. १६ मार्च रोजी बाजार समितीमध्ये २ हजार क्विंटल तूर व ४ हजार क्विंटल हरभºयाची आवक झाली. नेहमीच्या तुलनेत बाजारात शेतकºयांची वर्दळ कमी झाली असून, बाजारात विक्रीसाठी येणाºया शेतमालाची आवकही कमी झाली आहे, अशी माहिती अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुनील मालोकार यांनी दिली.