बोगस बियाण्यांमुळे शेतकरी हवालदिल!

By admin | Published: March 12, 2016 02:35 AM2016-03-12T02:35:36+5:302016-03-12T02:35:36+5:30

तेल्हारा तालुका : फसवणूक करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी.

Horses farmers due to bogus seeds! | बोगस बियाण्यांमुळे शेतकरी हवालदिल!

बोगस बियाण्यांमुळे शेतकरी हवालदिल!

Next

तेल्हारा : वांझोटी केळी रोपे देऊन फसवणूक केल्यानंतर आता कांद्या पिकाच्या सद्यस्थितीवरूनबियाणे बोगस दिल्याचा प्रकार समोर येण्याची शक्यता आहे.
अलीकडच्या काळात शेतकर्‍यांच्या माथी बोगस बियाणे मारून त्यांची फसवणूक होत असल्याचे प्रकार वाढत आहेत. बोगस बियाणे देणार्‍या कंपन्या, व्यापार्‍यांवर कठोर कारवाई होत नसल्याने शेतकर्‍यांच्या फसवणुकीचे प्रकार थांबत नसल्याचे दिसून येत आहे.
तेल्हारा तालुक्यात यावर्षी बाराशे हेक्टरच्यावर कांदा पिकाची लागवड करण्यात आली आहे. बेलखेड, दानापूर, माळेगाव, तळेगाव बाजार, आकोली, हिंगणी, हिवरखेड या बागायती क्षेत्रात कांदा लागवडीचे प्रमाण अधिक आहे. या भागातील शेतकर्‍यांनी काही खासगी व्यापार्‍यांकडून कांदा बियाणे खरेदी केले. कांदा पिकाला गोंडे पाहून कांद्यामध्ये पोंगा निर्माण होत आहे. त्यामुळे ऐन काढणीवर येत असलेल्या पिकात आपली फसवणूक होत असल्याचे शेतकर्‍यांचे लक्षात येत आहे. तळेगाव बाजार येथे ५00 एकरावर बोगस बियाणे कांदा लागवड झाली आहे. या आधी बेलखेड येथे केळी रोपे खरेदीमध्येसुद्धा शेतकर्‍यांची फसवणूक झाली आहे, तशी तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे.

Web Title: Horses farmers due to bogus seeds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.