वंचित मुलामुलींकरिता वसतिगृह व मंगल कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:17 AM2021-04-25T04:17:41+5:302021-04-25T04:17:41+5:30
अकोला : मराठा घाटोळे पाटील समाज विकास मंडळाच्या वतीने समाजातील वंचित मुलामुलींकरिता वसतिगृह आणि मंगल कार्यालयाची उभारणी केली जात ...
अकोला : मराठा घाटोळे पाटील समाज विकास मंडळाच्या वतीने समाजातील वंचित मुलामुलींकरिता वसतिगृह आणि मंगल कार्यालयाची उभारणी केली जात आहे. याकरिता समाजातील दानशूरांनी सहकार्य करावे, असे आवाहन मराठा घाटोळे पाटील विकास मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे
वंचित मुलामुलींकरिता वसतिगृह व मंगल कार्यालयासाठी मंडळ गेल्या सहा महिन्यांपासून लोकवर्गणी गोळा करत आहे. मंडळाने १२ एप्रिल २०२१ ला खडकी बु., अकोला येथे राष्ट्रीय महामार्गाला लागून ३८११५ स्क्वे. फुटांच्या भूखंडाची जवळपास दोन कोटी रुपयांस खरेदी केली आहे. या भूखंडावर समाजातील शिक्षणाकरिता आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलामुलींकरिता वसतिगृह करणे, तसेच समाजातील समाजबांधव अकोला येथे आजाराने हॉस्पिटलला भरती असल्यास घरच्यांची निवासाची व्यवस्था व अल्पदरात भोजन व्यवस्था करण्याचा मंडळाचा मानस आहे. विवाह समारंभाकरिता मंगल कार्यालय व शिकवणीकरिता ट्युशन क्लासेस असे सामाजिक उत्थान व्हावे असे प्रकल्प राबवण्याचा मंडळाने संकल्प केला आहे. याकरिता मंडळाचे अध्यक्ष दिलीपराव नानोटे व नारायणराव बारड, भाऊसाहेब काळे, बळीराम कपले, दिलीपराव बोबडे, सुरेशराव गाडवे, रावसाहेब राहाणे, श्रावणजी फाले, दयानंद पावशे, सतीशराव पा. गाठे, पीयूषराव चव्हाण, जगदेवराव मार्गे, शरदराव दहातोंडे, हरिश्चंद्र डांगे, विजयराव लकडे, अरविंदराव कपले, रूपेशराव लडे, गणेशराव नानोटे, महेंद्र गाडवे, मनीषराव सरोदे, सहदेवराव शिंदे हे संचालक मंडळ कार्यरत आहे.