आकाशच्या फटकेबाजीने यजमान नागपूर पराभूत

By admin | Published: May 26, 2014 09:28 PM2014-05-26T21:28:26+5:302014-05-27T19:24:17+5:30

अकोला संघाने गाठली उपान्त्यफेरी समीर डोईफोडेने टिपले ६ गडी

Hosts defeated Nagpur by scorching the sky | आकाशच्या फटकेबाजीने यजमान नागपूर पराभूत

आकाशच्या फटकेबाजीने यजमान नागपूर पराभूत

Next

अकोला: विदर्भ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नागपूर येथे आयोजित १३ वर्षाखालील शरद भाके स्मृती टी-३० स्पर्धेतील सोमवार २६ मे रोजी झालेल्या सामन्यात अकोला जिमखाना संघाने यजमान शरद भाके क्रिकेट अकादमी, नागपूर संघाचा तब्बल २० धावांनी पराभव करून उपान्त्यफेरी गाठली. मध्यमगती अष्टपैलू खेळाडू आकाश राऊत याने बहारदार फलंदाजीचे प्रदर्शन करीत २३ चेंडूत २६ धावा काढून संघाला स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवून दिला.
प्रताप नगर चौक मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात अकोला संघाने २८ षटकात सर्वबाद १०३ धावा काढल्या. यामध्ये आकाश राऊतच्या २३ चेंडूत २६ धावा, श्यामलच्या १३, मितेश भारूकाच्या १२ धावांचा समावेश आहे. नागपूर संघाकडून निखिल कर्णिक याने ४, प्रियांशू गांगुली याने २ तर यश मठाणी, मेहुल रायकर आणि जय कडबे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
यजमान शरद भाके अकादमी नागपूर संघ १०४ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरला. अकोला संघाचा कर्णधार समीर डोईफोडे याच्या भेदक गोलंदाजीने ६ बळी घेतल्याने नागपूर संघ पुरता साफ झाला. नागपूर संघाच्या प्रियांशू गांगुली याने २१, श्रेयश गांगुली याच्या १६ वगळता अन्य एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही. समीर डोईफोडे याने ६, सयाजी देशमुख याने २ आणि श्यामल निखाडे याने १ गडी बाद केला.
दरम्यान, बलाढ्य प्रवीण हिंगणीकर अकादमी, नागपूर आणि अकोला जिमखाना संघाने तीन-तीन सामने जिंकले; परंतु गुणांच्या आधारावर आघाडी घेत अकोला संघाने उपान्त्यफेरीत प्रवेश केला; मात्र प्रवीण हिंगणीकर संघाला स्पर्धेबाहेर व्हावे लागले. अकोला संघ प्रशिक्षक माजी रणजीपटू संतोष देशमुख यांच्या मार्गदर्शनात कामगिरी करीत आहे. संघ व्यवस्थापक कृष्णा टापरे आहेत. 

Web Title: Hosts defeated Nagpur by scorching the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.