पातूरच्या स्मशानभूमीत अंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:22 AM2021-09-24T04:22:15+5:302021-09-24T04:22:15+5:30

पातूर येथील हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना सेवा देण्यासाठी अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार ...

Hot water facility for bathing in Pathur cemetery | पातूरच्या स्मशानभूमीत अंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा

पातूरच्या स्मशानभूमीत अंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा

Next

पातूर येथील हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना सेवा देण्यासाठी अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार परिसराची स्वछता देखभाल दुरुस्ती अभ्युदय फाउंडेशन स्वतः करीत आहे. या ठिकाणी विविध सेवा ही सेवाभावी संस्था देत आहे. अंत्यविधीसाठी आणि दशक्रियेसाठी येणाऱ्या नागरिकांना सुविधा देण्यासाठी अभ्युदय फाउंडेशन या संस्थेने संकल्प यज्ञाद्वारे नागरिकांना आवाहन केले आहे. यावेळी अभ्युदय फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल गाडगे, सचिव बंटी गहिलोत, डॉ. संजयसिंह परिहार, प्रवीण निलखन, दिलीप निमकंडे, प्रशांत बंड, शुभम पोहरे, चंद्रमणी धाडसे, हनुमंत कुंडेंवर आदी उपस्थित होते.

फोटो:

यांनी उपलब्ध केले गिझर!

पातूर येथील उद्योजक बबलू बयस, योगेश पैठणकर, सतीश कवले व मित्र परिवार यांनी २५ लिटर गिझर अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेला समर्पित केले. त्यानुसार अभ्युदय फाउंडेशनने गिझर बसवून नागरिकांच्या सेवेत नागरिकांसाठी समर्पित केले. त्यामुळे दशक्रियेसाठी येणाऱ्या नागरिकांना आता अंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Web Title: Hot water facility for bathing in Pathur cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.