डाबकी रेल्वेगेटवर तासभर ‘ट्रॅफिक ज्ॉम'

By admin | Published: January 10, 2017 02:23 AM2017-01-10T02:23:08+5:302017-01-10T02:23:08+5:30

छोट्या वाहनधारकांचा आततायीपणामुळे वाहतुक विस्कळीत झाली होती.

An hour-long 'traffic jam' | डाबकी रेल्वेगेटवर तासभर ‘ट्रॅफिक ज्ॉम'

डाबकी रेल्वेगेटवर तासभर ‘ट्रॅफिक ज्ॉम'

Next

अकोला, दि. ९- अकोल्यातून शेगाव, तेल्हारा, जळगाव जामोदकडे जाणार्‍या एकमेव मार्गावरील डाबकी रेल्वेगेटजवळ सोमवारी सकाळी ११ वाजता तब्बल तासभर ट्रॅफिक ज्ॉमचा सामना वाहनधारकांना करावा लागला. गेटपासून भौरदकडे जाणार्‍या रस्त्यावर जवळपास एक किलोमीटरपर्यंंत वाहनांच्या रांगा लागल्या. छोट्या वाहनधारकांच्या आततायीपणामुळे जड वाहनांचा मार्ग अडतो, त्यामुळे याठिकाणी ही समस्या सातत्याने उद्भवत आहे.
अकोला शहरातून शेगावकडे जाणार्‍या सर्वच वाहनांची गर्दी या रस्त्यावर असते. विशेषत: चतुर्थी आणि एकादशीला दुचाकी आणि छोट्या चारचाकी गाड्या, छोट्या-मोठय़ा पालख्यांनी हा रस्ता गजबजलेला असतो. सोमवारी एकादशी असल्याने शेगावकडे जाणार्‍या वाहनधारकांची गर्दी प्रचंड होती. त्याचवेळी आठवड्यातील पहिला दिवस म्हणून ग्रामीण भागातून येणार्‍यांची वाहनेही मोठय़ा प्रमाणात होती. सकाळी ११.१५ वाजता या सर्व वाहनधारकांची गर्दी रेल्वेगेट बंद असल्याने तेथे झाली. गेट उघडल्यानंतर सर्वांंनी आपलेच वाहन दामटण्याची घाई केली. त्या घाईत भौरदच्या दिशेने जाणार्‍या जड वाहनासमोर काही दुचाकी, चारचाकी गाड्या आल्या. गर्दी एवढी झाली की कोणतेही वाहन जागचे हलवणेही कठीण झाले. त्यातच दुसरी रेल्वेगाडी येण्याची सूचना मिळाली. गेटमनने गेट बंद करण्यासाठी एकच हल्लकल्लोळ केला. कसाबसा रेल्वे मार्ग मोकळा झाला. गेट बंद करण्यात आला. या काळात पारसकडे जाणार्‍या दोन, अकोलाकडे जाणारी एक रेल्वेगाडी निघून गेली. त्यानंतर गेट उघडण्यात आले. काहींनी स्वयंस्फूर्तपणे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर तब्बल तासाभराने या ट्रॅफिक ज्ॉममधून सुटका झाली.

Web Title: An hour-long 'traffic jam'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.