डाबकी रेल्वेगेटवर तासभर ट्रॅफिक जॅम
By admin | Published: January 9, 2017 09:22 PM2017-01-09T21:22:18+5:302017-01-09T21:22:18+5:30
अकोल्यातून शेगाव, तेल्हारा, जळगाव जामोदकडे जाणा-या एकमेव मार्गावरील डाबकी रेल्वेगेटजवळ सोमवारी ट्रॅफिक जॅमचा सामना वाहनधारकांना करावा लागला.
Next
>ऑनालाइन लोकमत
अकोला, दि. 09 - अकोल्यातून शेगाव, तेल्हारा, जळगाव जामोदकडे जाणा-या एकमेव मार्गावरील डाबकी रेल्वेगेटजवळ सोमवारी ट्रॅफिक जॅमचा सामना वाहनधारकांना करावा लागला. गेटपासून भौरदकडे जाणाºया रस्त्यावर जवळपास एक किलोमिटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. छोट्या वाहनधारकांच्या आततायीपणामुळे जडवाहनांचा मार्ग अडतो, त्यामुळे याठिकाणी ही समस्या सातत्याने उद्भवत आहे.
अकोला शहरातून शेगावकडे जाणाºया सर्वच वाहनांची गर्दी या रस्त्यावर असते. विशेषत: चतुर्थी आणि एकादशीला दुचाकी आणि छोट्या चारचाकी गाड्या, छोट्या-मोठ्या पालख्यांनी हा रस्ता गजबजलेला असतो. सोमवारी एकादशी असल्याने शेगावकडे जाणाºया वाहनधारकांची गर्दी प्रचंड होती. त्याचवेळी आठवड्यातील पहिला दिवस म्हणून ग्रामीण भागातून येणाºयांची वाहनेही मोठ्या प्रमाणात होती. या सर्व वाहनधारकांची गर्दी रेल्वेगेट बंद असल्याने तेथे झाली. गेट उघडल्यानंतर सर्वांनी आपलेच वाहन दामटण्याची घाई केली. त्या घाईत भौरदच्या दिशेने जाणा-या जडवाहनासमोर काही दुचाकी, चारचाकी गाड्या आल्या. गर्दी एवढी झाली की कोणतेही वाहन जागचे हलवणेही कठिण झाले. त्यातच दुसरी रेल्वेगाडी येण्याची सूचना मिळाली. गेटमनने गेट बंद करण्यासाठी एकच हल्लकल्लोळ केला. कसाबसा रेल्वे मार्ग मोकळा झाला. गेट बंद करण्यात आला. या काळात पारसकडे जाणाºया दोन, अकोलाकडे जाणारी एक रेल्वेगाडी निघून गेली. त्यानंतर गेट उघडण्यात आला. काहींनी स्वयंस्फूर्तपणे वाहतूक सुरळित करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर तब्बल तासाभराने या ट्रॅफिक जॅममधून सुटका झाली.