घरातील कत्तलखान्याचा पोलिसांनी केला पर्दाफाश!

By admin | Published: May 7, 2017 02:46 AM2017-05-07T02:46:16+5:302017-05-07T02:46:16+5:30

अकोल्यातील घटना; एकास अटक, १६ बैलांची सुटका.

House slaughterhouse police busted! | घरातील कत्तलखान्याचा पोलिसांनी केला पर्दाफाश!

घरातील कत्तलखान्याचा पोलिसांनी केला पर्दाफाश!

Next

अकोला: पातूर रोडवरील इन्स्पेक्टर नगरातील एका घरातील कत्तलखान्याचा जुने शहर पोलिसांनी शनिवारी सकाळी पर्दाफाश केला. पोलिसांनी एकास अटक करून त्याच्या ताब्यातील १६ बैलांची सुटका केली.
जुने शहरचे पोलीस निरीक्षक रियाज शेख यांना गोवंशाची कत्तल करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पातूर रोडवरील इन्स्पेक्टर नगरमधील शेख इरशाद शेख रहीम (२६) याच्या घरी छापा टाकला. त्यावेळी शेख इरशाद हा त्याच्या घरात कत्तलखानाच चालवित असल्याचे दिसून आले. तसेच घराच्या एका खोलीत १६ बैलांना डांबून ठेवल्याचे दिसून आले. पोलिसांनी शेख इरशादला अटक करून त्याच्याकडील बैलांची सुटका केली. बैलांची किंमत तीन लाख २0 हजार रुपये आहे. बैलांना गोरक्षण संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले.

Web Title: House slaughterhouse police busted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.