शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना स्वयंरोजगारासाठी साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:49 PM2019-01-20T12:49:49+5:302019-01-20T12:49:56+5:30
२०१८-१९ मध्ये जिल्ह्यात झालेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त ५० कुटुंबांना स्वयंरोजगारासाठी साहित्य देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभेत घेण्यात आला.
अकोला: निसर्गाचा लहरीपणा, शासनाचे चुकीचे धोरण, लालफीतशाहीचा कारभार यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीस आला आहे. अनेकदा तर मशागत, पेरणीचा खर्च निघेल, एवढेही उत्पन्न शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीतून होत नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढतच जातो आणि शेतकºयांवर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येते. २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात झालेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त ५० कुटुंबांना स्वयंरोजगारासाठी साहित्य देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभेत घेण्यात आला. शनिवारी झालेल्या सभेत शेतकरी कुटुंबांना देण्यात येणाºया साहित्याची किंमत प्रत्येकी १० हजार रुपयांपर्यंत मर्यादित राहणार आहे. यासाठी एकूण पाच लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती देण्यात आली.
शासनाच्या लेखी मदतीसाठी पात्र असलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत देण्यात येणार आहे. या सभेला सभापती माधुरी गावंडे, सदस्य शोभा शेळके, चंद्रशेखर पांडे, रमण जैन, डॉ. हिंमतराव घोटोळ, विलास सिरसाट व पंचायत समितीचे कृषी अधिकारी गोपाल बोंडे उपस्थित होते.
कृषी क्षेत्रासाठी ४ कोटी ७० लाखांची तरतूद
आगामी अर्थसंकल्पातील तरतुदीबाबत कृषी समितीच्या सभेत चर्चा करण्यात आली. त्यावेळी विविध योजनांसाठी तब्बल ४ कोटी ७० लाखांची तरतूद करण्यात आली.
सबमर्सिबल पंप (साडेसात व पाच अश्वशक्ती): ५३ लाख
पीव्हीसी पाइप:- २६ लाख ५० हजार
ताडपत्री :- ५३ लाख ५० हजार
पेरणी यंत्र:- ५३ लाख ५० हजार
सोयाबीन सेटरेट:-२६ लाख ५० हजार
चाप कटर:- २६ लाख ५० हजार
सौर दिवे (स्टंड):- २६ लाख ५० हजार
विहिरींवर पंपासाठी (साडेसात व पाच अश्वशक्ती) :- ५३ लाख
डीझल पंप:- २६ लाख ५० हजार
ग्राइंडर (कव्हर):- २६.५० हजार