माझ्यापेक्षा माझ्या मित्राला जास्त गुण कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:22 AM2021-08-23T04:22:31+5:302021-08-23T04:22:31+5:30

एकूण विद्यार्थी संख्या दहावीचे विद्यार्थी २५६३३ बारावीचे विद्यार्थी २३२४० पास झालेले विद्यार्थी दहावीचे २५६३१ बारावीचे २३०७० निकालावर नाराज असलेले ...

How can my friend have more points than me? | माझ्यापेक्षा माझ्या मित्राला जास्त गुण कसे?

माझ्यापेक्षा माझ्या मित्राला जास्त गुण कसे?

Next

एकूण विद्यार्थी संख्या

दहावीचे विद्यार्थी २५६३३

बारावीचे विद्यार्थी २३२४०

पास झालेले विद्यार्थी

दहावीचे २५६३१

बारावीचे २३०७०

निकालावर नाराज असलेले पालक म्हणाले...

दरवर्षी माझ्या मुलाचा निकाल उत्तम लागतो. त्याला आतापर्यंत प्रत्येक इयत्तेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळत आले. दहावीची परीक्षा झाली असती तर त्यातही अपेक्षेनुरूप गुण मिळाले असते; मात्र तो शिकत असलेल्या शाळेने दिलेले गुण फारच कमी आहेत. त्यामुळे नाराज झालो.

- देवेंद्र इंगळे

यंदा परीक्षा झाल्या नाहीत. ऑनलाइनमुळे अडचणी येत आहेत. पुढच्या शिक्षणासाठी हे दहावीचे वर्ष महत्त्वाचे म्हणून ओळखले जाते. शाळेतील काही शिक्षकांनी मात्र भेदभाव करून मुलाला हेतुपुरस्सर कमी गुण दिले, त्यांची कुवत नाही, त्यांना परीक्षेत अधिक गुण मिळाले. हा एकप्रकारे अन्याय आहे.

- राजेश जैन

परीक्षा नाही, पुनर्मूल्यांकनही नाही!

कोरोना संकटामुळे दहावी, बारावीची परीक्षा झालीच नाही. अंतर्गत मूल्यमापन, तोंडी, प्रात्यक्षिक आदींच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला.

दरम्यान परीक्षा न होताच विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले. आता त्याचे पुनर्मूल्यांकन करण्याची कुठलीच सोय नसल्याने हुशार व होतकरु विद्यार्थी, त्यांच्या पालकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

मी त्याच्यापेक्षा हुशार, मग त्याला माझ्यापेक्षा जास्त गुण कसे?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा झालीच नाही; तर अंतर्गत मूल्यमापन, तोंडी, प्रात्यक्षिक आदींच्या आधारे दहावी, बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला.

निकालाची एकूण टक्केवारी जोरदार आहे; मात्र मी त्याच्यापेक्षा हुशार, मग त्याला माझ्यापेक्षा जास्त गुण कसे? असा प्रश्न अनेक विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित करीत आहेत.

विद्यार्थी म्हणतात...

वर्गातील हुशार मुलांपैकी मी एक आहे. दहावीच्या परीक्षेची कसून तयारी केली होती; मात्र कोरोनामुळे परीक्षा रद्द झाली. जाहीर झालेल्या निकालात शाळेकडून देण्यात आलेले गुण तुलनेने खूपच कमी आहेत. जे माझे मित्र हुशार नव्हते, त्यांना माझ्यापेक्षा अधिक गुण मिळाले.

- भावेश पंडित

मी इयत्ता आठवीपासूनच दहावीच्या परीक्षेत वर्गात सर्वाधिक गुण मिळवायचे, असा निर्धार केला होता. त्यानुसार नियोजन करून खूप अभ्यासदेखील केला; मात्र कोरोनामुळे दहावीची परीक्षाच झाली नाही. शाळेने जाहीर केलेल्या निकालात हुशार नसलेल्या मित्रांपेक्षा मला कमी गुण देण्यात आले.

- दीपक नेमाने

Web Title: How can my friend have more points than me?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.