डेल्टा प्लसला कसे राेखणार, अशाेक वाटिका चाैकात दहापैकी सहा विनामास्क, दाेघांच्या हनुवटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:23 AM2021-08-12T04:23:18+5:302021-08-12T04:23:18+5:30
अकाेला : काेराेना संसर्ग कमी हाेत असला तरी प्रशासनाकडून काेराेना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या ...
अकाेला : काेराेना संसर्ग कमी हाेत असला तरी प्रशासनाकडून काेराेना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या आवाहनाला मात्र नागरिकांकडून खाे दिला जात असल्याचे ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीवरून दिसून आले. अकाेला शहरातील सर्वांत माेठ्या चाैकातून वाहनचालक मार्गक्रमण करीत असताना १० जणांमागे ६ जण विनामास्क दिसून आले. तर दाेन जण त्यांचा मास्क हनवटीला लावून वाहन चालवीत असल्याचे स्पष्ट झाले़ तर वाहनावर पाठीमागे बसलेले विनामास्क असल्याचेही लाेकमतने केलेल्या पाहणीतून उघडकीस आले़
शहरातील महत्त्वाचे चाैक असलेल्या अशाेक वाटिका चाैक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर चाैक, धिंग्रा चाैक, टाॅवर चाैक, रतनलाल प्लाॅट चाैक, जठारपेठ चाैक, तुकाराम चाैक, काैलखेड चाैक, सिंधी कॅम्प चाैक, सातव चाैक यासह शहराच्या विविध भागात पाहणी केली असता दुचाकीवरील बहुतांश वाहनचालक हे विनामास्कच असल्याचे दिसून आले़ तर, पाठीमागे बसलेल्यांनाही मास्क नसल्याचे या पाहणीत समाेर आले़ त्यामुळे काेट्यवधी रुपयांचा दंड वसूल करूनही आणि अनेकांनी जीव गमावल्यानंतरही नागरिक मात्र बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे़ डेल्टा प्लसचा धाेका असतानाही नागरिकांची हे बेफिकिरी धाेकादायक असल्याचे समाेर येत आहे़
.............
मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई
विविध पाेलीस स्टेशन तसेच मनपाच्या पथकाकडून मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे.
आतापर्यंत काेट्यवधी रुपयांचा दंड मास्क न वापरणाऱ्यांकडून वसूल करण्यात आला आहे.
आजच्या घडीलाही मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई माेहीम सुरू आहे.
...........
काही चाैकांतील पाेलिसांचाही मास्क ताेंडाखाली
काही चाैकांत पाेलिसांचे मास्क ताेंडाखाली दिसून आले.
विविध पाेलीस स्टेशन तसेच चाैकात उभ्या असलेल्या पाेलिसांना मास्क नसल्याचे दिसले़
पाेलीस अधिकारी मास्क वापरत असल्याचे दिसले़ तर, काही चाैकातील पाेलिसही मास्क आवर्जून वापरत असल्याचे पाहणीत समाेर आले़
...........
जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्यांवर सर्वाधिक दंड हा अकाेला शहरात करण्यात आला आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, काेणालाही साेडण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर यांचे आहेत. त्यानुसार दरराेज शहरातील प्रत्येक चाैकात मास्क न वापरणाऱ्या शेकडाे जणांवर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई अधिक तीव्र करून मास्क न वापरणाऱ्यांना दंड करणार आहे.
-सचिन कदम
शहर पाेलीस उपअधीक्षक, अकाेला