मोटवाणी-आहुजांकडे शेकडो कोटी आले कुठून? चर्चांना उधाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 01:16 AM2018-02-01T01:16:21+5:302018-02-01T01:17:53+5:30

अकोला : बारा-पंधरा वर्षाआधी अकोला बाजारपेठेत एक -एक दुकान घेऊन बसणारे मोटवाणी आणि आहुजा आज शेकडो कोटींचे मालक झाले आहेत. दुकानदारापासून उद्योजकापर्यंत पोहोचणार्‍या या परिवाराची लॉटरी लागली तरी कोठे? असा प्रश्न शहरातील इतर व्यापार्‍यांसाठी संशोधनाचा विषय ठरतो आहे. बुधवारी प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांनी आहुजा आणि मोटवाणी या उद्योजकांच्या ग्रुपमधील २१ प्रतिष्ठानांवर एकाच वेळी सर्च सुरू केला त्यानंतर आता मोटवाणी-आहुजा यांच्या श्रीमंतीचे किस्से बाजारात चर्चेचा विषय झाले आहेत.

How many hundreds of crores have come to Motwani-Ahuja? Church Plans! | मोटवाणी-आहुजांकडे शेकडो कोटी आले कुठून? चर्चांना उधाण!

मोटवाणी-आहुजांकडे शेकडो कोटी आले कुठून? चर्चांना उधाण!

Next
ठळक मुद्दे२१ प्रतिष्ठानांची प्राप्तिकर विभागाकडून तपासणी! 

संजय खांडेकर । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बारा-पंधरा वर्षाआधी अकोला बाजारपेठेत एक -एक दुकान घेऊन बसणारे मोटवाणी आणि आहुजा आज शेकडो कोटींचे मालक झाले आहेत. दुकानदारापासून उद्योजकापर्यंत पोहोचणार्‍या या परिवाराची लॉटरी लागली तरी कोठे? असा प्रश्न शहरातील इतर व्यापार्‍यांसाठी संशोधनाचा विषय ठरतो आहे. बुधवारी प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांनी आहुजा आणि मोटवाणी  या उद्योजकांच्या ग्रुपमधील २१ प्रतिष्ठानांवर एकाच वेळी सर्च सुरू केला त्यानंतर आता मोटवाणी -आहुजा यांच्या श्रीमंतीचे किस्से बाजारात चर्चेचा विषय झाले आहेत.
सिंधी कॅम्पच्या कच्ची खोलीत राहणारे नंदू मोटवाणी आणि त्यांच्या तीन सख्या भांवडांच्या परिवाराचा मोठा विस्तार झाला आहे. पंधरा वर्षाआधी या परिवाराचे टिळक मार्गावर अकोला पाइप फिटिंग आणि दगडी पुलाजवळ सिंध हार्डवेअरचे  दुकान होते, ते आजही आहे. त्यानंतर मोटवाणी यांनी योगेश स्टिलसह रिधोरा येथे पाइपची फॅक्टरी टाकण्यापर्यंत मजल गाठली. चायना कंपनीच्या मोबाईल विक्री ठोक ने करणारे व्यापारी आणि सिगारेटीचे उद्योजक म्हणून नंतर हा परिवार मे. हकीकतराय अँन्ड सन्स म्हणून नावारूपास आला. अल्पावधीतच मोटवाणी परिवार शेकडो कोटींचे मालक झाले. अकोला महापालिका निवडणुकीच्या वेळी परिवारातील सदस्य अनिल कन्हैया मोटवाणी याला भाजपचे तिकीट मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत एक लॉबी पोहोचली होती. सोबतच नव्याने उभारण्यात येत असलेल्या न्यू किराणा बाजाराजवळील व्यापारी संकुलात मोटवाणी परिवाराने २0 गाळे आधीच बुक केले आहेत. अकोला आणि शहराबाहेर या परिवाराची मोठी बेनामी मालमत्ता असल्याचीही चर्चा सर्च ऑपरेशन नंतर बाजारपेठेत आहे. काही महिन्याआधी या परिवाराने एक कोटींची र्मसडीज कंपनीची कार विकत घेतली आहे. मोटवाणी परिवाराच्या कीर्तीप्रमाणे आहुजा परिवाराची देखील कीर्ती अशीच आहे. रयत हवेलीजवळच्या पिंपळेश्‍वर मंदिराजवळ या परिवाराचे एक लहानशे दुकान होते. किराणा व्यापाराच्या भरवशावर या परिवाराने दयाराम अँन्ड सन्स आणि धनराज ट्रेडर्स प्रतिष्ठान उभारले. पंधरा वर्षांच्या आत या परिवाराने दयाराम इंडस्ट्रिजपर्यंत झेप घेतली. देशातील अत्याधुनिक मशनरी असलेली दालमिल आहुजा परिवाराकडे आहे. सोबतच बायपास मार्गावरील न्यू किराणा बाजारात कोट्यवधीचे तीन गाळे या परिवाराने घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.अल्पावधीत शेकडो कोटींचे मालक झालेल्या मोटवाणी-आहुजा यांनी असा कोणता व्यवसाय केला, की पंधरा वर्षांत त्यांच्या अनेक फर्मचा विस्तार झाला. हा विषय आता अकोल्यातील व्यापार्‍यांसाठी संशोधनाचा ठरतो आहे. दोन्ही परिवाराच्या अनेक नातेवाईकांच्या नावानेदेखील बेनामी मालमत्ता असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान आहुजा आणि मोटवाणी या  उद्योजकांच्या प्रतिष्ठानावर प्राप्तिकर विभागाने सुर केलेला सर्च गुरूवारीही सुरू राहणार असल्याची माहिती आहे.
 

Web Title: How many hundreds of crores have come to Motwani-Ahuja? Church Plans!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.