गॅस सिलिंडरची सबसिडी आहे तरी किती?

By admin | Published: September 6, 2016 02:28 AM2016-09-06T02:28:01+5:302016-09-06T02:28:01+5:30

गॅस सबसिडीमध्ये महिन्याकाठी होतो बदल; त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

How much is the gas cylinder subsidy? | गॅस सिलिंडरची सबसिडी आहे तरी किती?

गॅस सिलिंडरची सबसिडी आहे तरी किती?

Next

अकोला, दि. ५ : गॅस सिलिंडरधारकांच्या थेट बँक खात्यात सबसिडी रक्कम जमा केली जाते; मात्र प्रत्येक महिन्यात सिलिंडरचे दर बदलत असल्याने, सबसिडीच्या रकमेतही बदल होतो. त्यामुळे गॅस सिलिंडरची सबसिडी आहे तरी किती, याबाबत गॅस सिलिंडर ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
केंद्र शासनाच्या निर्णयानुसार गॅस सिलिंडर सबसिडीची रक्कम थेट गॅस सिलिंडर ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. गॅस सिलिंडर वितरकांकडे सिलिंडरच्या मूळ रकमेचा भरणा केल्यानंतर सबसिडीची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केली जाते; परंतु केंद्र शासनाच्या पेट्रोलियम मंत्रालयामार्फत गॅस सिलिंडरचे दर प्रत्येक महिन्यात बदलतात. गॅस सिलिंडरच्या दरातील कमी-जास्त रकमेच्या बदलानुसार गॅस सिलिंडरधारकांना दिल्या जाणार्‍या सबसिडीच्या रकमेतही बदल होतो. त्यामुळे एका महिन्यात सिलिंडर सबसिडीची ग्राहकांच्या बँक खात्यात जेवढी जमा होते, तेवढीच सबसिडीची रक्कम दुसर्‍या महिन्यात बँक खात्यात जमा होत नाही.
गॅस सिलिंडर सबसिडी रक्कम बँक खात्यात जमा होण्याचे निश्‍चित नाही. महिन्याकाठी गॅस सिलिंडरच्या दरात होणारे बदल आणि त्यानुसार सबसिडी रकमेत बदल होत असल्याने, सिलिंडरची सबसिडी आहे तरी किती, याबाबत गॅस सिलिंडर ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्हय़ात ४८ रुपये सबसिडी!
केंद्र शासनामार्फत निश्‍चित करण्यात आलेल्या दरानुसार सप्टेंबर महिन्यात अकोला जिल्हय़ातील गॅस सिलिंडरधारकांना ५0८ रुपये ५0 पैसे देऊन सिलिंडर घ्यावे लागत आहे. वितरकांकडे रकमेचा भरणा केल्यानंतर सिलिंडरची ४८ रुपये २३ पैसे इतकी रक्कम गॅस सिलिंडरधारकांच्या बँक खात्यात जमा होत आहे. गत ऑगस्ट महिन्यात प्रती सिलिंडरचे दर ५३१ रुपये होते. त्यापैकी ७४ रुपये प्रमाणे सबसिडीची रक्कम गॅस सिलिंडरधारकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली.

Web Title: How much is the gas cylinder subsidy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.