डेल्टा प्लसला कसे रोखणार; दोन्ही डोस घेणारे केवळ ०.६ टक्के!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:14 AM2021-07-02T04:14:05+5:302021-07-02T04:14:05+5:30
कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १४ लाख ५२ हजार ९०२ नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने समोर ठेवले ...
कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १४ लाख ५२ हजार ९०२ नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने समोर ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य विभागाने १६ जानेवारीपासून वाटचाल सुरू केली. जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला असून, आतापर्यंत ४ लाख ३ हजार ४७० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यापैकी ३ लाख ९१ हजार ९७२ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. म्हणजेच एकूण लक्ष्याच्या २१ टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर केवळ ८३ हजार ८५२ म्हणजेच ०.६ टक्के लोकांनीच लसीचा दुसरा डोस घेतला आहे. कोविडच्या डेल्टा प्लसच्या निमित्ताने तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात असताना, जिल्ह्यातील लसीकरणाची ही आकडेवारी थक्क करणारी आहे.
वयोगट पहिला डोस - दुसरा डोस
१८ ते ४४ - ५९,५४३ - ६,५३७
४५ वर्षांवरील - २,२०,९०६ - ६२,३९८
१८ वर्षांवरील लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर, जिल्ह्यातील लसीकरणाला वेग आला आहे. लसीकरणासाठी आवश्यक लसीचा साठाही पुरेपूर उपलब्ध आहे. त्यामुळे येत्या काळात लसीकरणाला वेग येईल.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण, अकोला