हावडा-एलटीटी एक्स्प्रेस १ एप्रिलपर्यंत धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:17 AM2021-01-21T04:17:47+5:302021-01-21T04:17:47+5:30

०१२३५ नागपूर-मडगाव ही उत्सव विशेष गाडी २६ मार्च आणि ०१२३६ मडगाव-नागपूर ही गाडी २७ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे ...

Howrah-LTT Express will run till April 1 | हावडा-एलटीटी एक्स्प्रेस १ एप्रिलपर्यंत धावणार

हावडा-एलटीटी एक्स्प्रेस १ एप्रिलपर्यंत धावणार

Next

०१२३५ नागपूर-मडगाव ही उत्सव विशेष गाडी २६ मार्च आणि ०१२३६ मडगाव-नागपूर ही गाडी २७ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे ०२८७९ एलटीटी-भुवनेश्वर ही गाडी ३१ मार्चपर्यंत प्रस्थान स्थानकावरून दर बुधवार व शनिवारी, तर ०२८८० भुवनेश्वर-एलटीटी ही गाडी २९ मार्चपर्यंत दर सोमवार व गुरुवारी प्रस्थान स्थानकावरून धावणार आहे.

या गाड्या पूर्णपणे आरक्षित असून, प्रवास करताना कोविड १९ नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

साप्ताहिक गाड्यांचाही विस्तार

अकोल्यात थांबा असलेल्या साप्ताहिक गाड्यांपैकी ०२८५८ एलटीटी-विशाखापट्टनम ही गाडी ३० मार्चपर्यंत दर मंगळवारी प्रस्थान स्थानकावरून रवाना होईल. तर ०२८५७ विशाखापट्टनम-एलटीटी ही गाडी २८ मार्चपर्यंत दर रविवारी विशाखापट्टनम येथून रवाना होईल.

०८५०१ विशाखापट्टनम-गांधीधाम ही विशेष गाडी २५ मार्चपर्यंत दर गुरुवारी विशाखापट्टनम येथून रवाना होईल. तर ०८५०२ गांधीधाम-विशाखापट्टन ही विशेष गाडी २८ मार्चपर्यंत दर रविवारी गांधीधाम स्थानकावरून निर्धारित वेळेला रवाना होईल.

Web Title: Howrah-LTT Express will run till April 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.