कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची ॲलर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:19 AM2021-05-20T04:19:58+5:302021-05-20T04:19:58+5:30

अकोला : शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र अनेक अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत ...

HQ allergies to employees | कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची ॲलर्जी

कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची ॲलर्जी

Next

अकोला : शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र अनेक अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

----------------------------------------------

मास्क विक्रीच्या व्यवसायावर उदरनिर्वाह

अकोला : कोरोनामुळे कडक निर्बंध लावण्यात आले. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत जीवनावश्यक वस्तूची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र इतर व्यवसाय बंद असल्याने अनेकांनी मास्क विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.

-----------------------------------------------

शेणखताची जुळवाजुळव

अकोला : शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यातच खताच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे रासायनिक खताला पर्याय म्हणून शेणखताचा वापर करण्यास शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे शेणखताची जुळवाजुळव शेतकऱ्यांकडून होताना दिसून येत आहे.

--------------------------------------------------

दैनंदिन पैसे जमा करणाऱ्यांना कोरोनाचा फटका

अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहे. याचा फटका शहरातील व्यावसायिक, दुकानदारांकडून दैनंदिन पैसे जमा करणाऱ्यांना बँकेच्या एजन्टला बसला आहे. त्यामुळे अनेकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला आहे.

Web Title: HQ allergies to employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.