अकोल्यात मुलीच हुश्शार...जिल्ह्याचा निकाल ८७.४२ टक्के

By atul.jaiswal | Published: May 28, 2019 02:00 PM2019-05-28T14:00:53+5:302019-05-28T14:06:32+5:30

अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत अकोला जिल्ह्याचा निकाल ८७.४२ टक्के लागला आहे.

HSC EXAM result of the akola district is 87.42 percent | अकोल्यात मुलीच हुश्शार...जिल्ह्याचा निकाल ८७.४२ टक्के

अकोल्यात मुलीच हुश्शार...जिल्ह्याचा निकाल ८७.४२ टक्के

Next

- अतुल जयस्वाल

अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत अकोला जिल्ह्याचा निकाल ८७.४२ टक्के लागला आहे. यामध्ये मुलींनी बाजी मारली असून, मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१.४६ टक्के एवढी आहे. याहीवर्षी निकालामध्ये मुलींनी भरारी घेतली आहे.
जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी २५ हजार ३२० नियमित विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी २५ हजार ३०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी २२ हजार १२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ८७.४२ अशी आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ११४१६ मुले व १०७०५ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८३.९४, तर मुलींची टक्केवारी ९१.४६ अशी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल अकोट तालुक्याचा ८९.४६ टक्के लागला आहे. त्या खालोखाल पातूर तालुका ८९.४५ टक्के, बार्शीटाकळी तालुका ८८.७८ टक्के, अकोला तालुका ८७.११ टक्के, बाळापूर तालुका ८६.३८ टक्के, मूर्तीजापूर तालुका ८५.९७ टक्के, तर सर्वात कमी निकाल तेल्हारा तालुक्याचा ८४.३८ टक्के लागला आहे.

Web Title: HSC EXAM result of the akola district is 87.42 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.