HSC Result : अकोला जिल्ह्याचा निकाल ९९.२६: जिल्ह्यातून मुली आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 06:21 PM2021-08-03T18:21:04+5:302021-08-03T18:25:55+5:30
HSC Result: पहिल्यांदाच बारावीच्या निकालात जिल्ह्याने ९९.२६ टक्क्यांवर झेप घेतली आहे.
पहिल्यांदाच बारावीत जिल्ह्याची ९९ टक्क्यांवर झेप!अकोला: यंदा कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे मूल्यमापन कार्यपद्धती व दहावीत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व बारावीतील अंतर्गत गुणांच्या आधारे मंगळवारी दुपारी ऑनलाइन निकाल जाहिर करण्यात आला. पहिल्यांदाच बारावीच्या निकालात जिल्ह्याने ९९.२६ टक्क्यांवर झेप घेतली आहे. अपेक्षेप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा बारावीची परीक्षा रद्द झाली. परंतु परीक्षेसाठी जिल्ह्यातून १२ हजार २१८ मुले आणि ११ हजार २२ मुलींनी असे एकूण २३ हजार २४० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. मंगळवारी दुपारी ऑनलाईन निकाल जाहिर झाला. निकालामध्ये जिल्ह्याचा प्रथमच एकूण निकाल ९९.२६ टक्के लागला असून, १२ हजार १०१ मुले व १० हजार ९६९ मुली असे एकूण २३ हजार ७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातून केवळ १७० विद्यार्थीच बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.०४ आहे तर मुलींची टक्केवारी ९९.५१ टक्के आहे.