एचटीबीटी कपाशी लागवड; शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:40 PM2019-06-25T12:40:28+5:302019-06-25T13:52:24+5:30
एचटीबीटी कपाशी व बीटी वांग्यांची अडगाव येथील शेतांमध्ये लागवड केल्याप्रकरणी शेतकरी संघटनेचे प्रवक्ता ललीत बहाळे यांच्यासह १२ जणांविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी मंगळवारी गुन्हे दाखल केले.
हिवरखेड (अकोला ): मान्यता नसलेल्या एचटीबीटी कपाशी व बीटी वांग्यांची अडगाव येथील शेतांमध्ये लागवड केल्याप्रकरणी शेतकरी संघटनेचे प्रवक्ता ललीत बहाळे यांच्यासह १२ जणांविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी मंगळवारी गुन्हे दाखल केले. एचटीबीटी कपाशी व बीटी वांलागवड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.
‘माझं वावर-माझी पॉवर’, या शेतकरी तंत्रज्ञान स्वतंत्रताकरिता संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत शेतकऱ्यांनी यापूर्वी एचटीबीटी बियाणे पेरणीचे तीन प्रयोग यशस्वी केले आहेत. २४ जूनला एचटीबीटी कापूस वाणाची पेरणी व बीटी वांग्याचे रोप टाकण्याचा चौथा प्रयोग करण्यात आला. एचटीबीटी बियाण्यांना मान्यता नसल्याने या बियाण्यांची लागवड करु नये, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. त्यानंतरही शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र येत शेतकºयांनी एचटीबीटी कपाशीची लागवड केली. या प्रकरणी तेल्हारा तालुक्याचे कृषी अधिकारी मिलिंद वानखडे यांनी केलेल्या तक्रारीवरुन हिवरखेड पोलिसांनी शेतकरी संघटनेचे प्रवक्ता ललीत सुधाकर बहाळे यांच्यासह लक्ष्मीकांत कौठकर, सिमा नराळे, प्रमिला भारसाकळे, प्रज्ज्वल बदरखे, निलेश नेमाडे, विक्रांत बोंद्रे, सतिष सरोदे, अमोल मसुरकार, गोपाल निमकर्डे, मोहन खिरोडकर, दिनेश गिºहे यांच्याविरु भादंवीच्या कलम ४२०, १४३, १८६, १८८, पर्यावरण संरक्षक कायदा १९८६ च्या कलम ७, ८, ११, १५/१, बियाणे कायदा १९६६ च्या कलम ७, एबीसीडी, १४ एबीसीडी अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास एसडीपीओ सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सोमनाथ पवार करीत आहेत.