हुदहूद पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 05:27 PM2020-01-13T17:27:49+5:302020-01-13T17:29:12+5:30
हुदहूद (हुप्पू) ग्रामीण भागात (सुतार) या नावाने ओळखला जाणारा पक्षी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
- संजय उमक
मूर्तिजापूर : बालपणी ग्रामीण भागात हमखास पहावयास मिळणारा व चिमुकल्यांचे आकर्षण असलेला लांब चोच, डोक्यावर काळा तुरा पाठीमागचा भाग काळ्या - पांढऱ्या पट्टेदार पिसांनी व्यापलेला असलेला हुदहूद (हुप्पू) ग्रामीण भागात (सुतार) या नावाने ओळखला जाणारा पक्षी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी पक्षी संवर्धनाची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचे पक्षी तज्ञांचे मत आहे.
ग्रामीण भागात, डोक्यावर तुरा असलेला व लांब चोच असणारा पक्षी सुतार पक्षी पक्षी म्हणून ओळखला जातो. वास्तविक तो सुतार नसून, त्याचे खरे नाव हुदहूद (लॅटीन : हुप्पू) असे आहे. सुतार पक्षी आकाराने लहान असतो. हुदहूद हा पक्षी गंदगी असलेल्या उकिरडे असलेल्या ग्रामीण परिसरात प्रामुख्याने आढळत असे. या ठिकाणी त्यांचे सहज होणारे दर्शन आता दुर्मिळ व अशक्य झाले आहे. भारतात दोनशेहून अधिक प्रजाती असणारा हुदहूद पक्षी हा प्रामुख्याने खेड्यातील मानवी वस्तीत पहायला मिळत असे. पहाता पहाता हा पक्षी खेड्यातून लुप्त झाला असल्याने आजमितीस शोधुनही सापडत मिळत नाही. अतीशय आकर्षक असलेला हा पक्षी अलीकडच्या काळात एकाएकी लुप्त झाल्याने हा संशोधनाचा विषय ऐरणीवर आला आहे. मातीच्या घरांच्या भिंतीमध्ये आपले घरटे करुन राहणारा हुदहूद आता खेड्यातील कॉंक्रेटीकरण व प्रचंड वृक्षतोड झाल्याने नामशेष झाला आहे. विशेषत: गवताळ भागातील जमिनीत हा पक्षी आपली अनकुचीदार चोच खुपसून त्यातून आपले अन्न शोधून काढत असे. गावाकडील गवताळ भागही राहीला नसल्याने अन्न व भक्ष्य शोधनेही जिकरीचे झाले आहे. त्यामुळे अस्तित्व धोक्यात आल्याने 'हुदहूद' नामशेष झाला असावा असाही अंदाज व्यक्त होत आहे.