सव्वा एकर शेतात घेतले सहा लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:19 AM2021-04-28T04:19:59+5:302021-04-28T04:19:59+5:30

कमी श्रमात अधिक उत्पन्न देणाऱ्या लसूण पिकाची लागवड करून त्यांनी भरघोस उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला. शेतीचा पोत ...

A huge income of Rs. 6 lakhs taken from a quarter acre farm! | सव्वा एकर शेतात घेतले सहा लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न!

सव्वा एकर शेतात घेतले सहा लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न!

Next

कमी श्रमात अधिक उत्पन्न देणाऱ्या लसूण पिकाची लागवड करून त्यांनी भरघोस उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला.

शेतीचा पोत आणि उपलब्ध पाणी याचा विचार करता, त्यांना लसून शेतीची कल्पना सुचली. परंतु, पेरणीसाठी बराच उशीर झाला होता. त्यांनी परिसरातील काही शेतकऱ्यांशी चर्चा करून लसून पेरणीचे नियोजन केले. त्यासाठी हिंगणा येथील शेतकरी नितीन उजाडे यांनी प्रोत्साहन दिले. विशेष म्हणजे उशीर झालेला असल्यावरही गोपाल पुरुषोत्तम यांनी कोणत्याही प्रकारचे आंतरपीक न घेता सव्वा एकर क्षेत्रावर लसणाची लागवड केली. त्यासाठी त्यांना ४/१-२ (साडेचार क्विंटल) बियाणे लागले. खते आणि कीटकनाशके यांच्यावर कमीत कमी खर्च करून साडेचार महिन्यांमध्ये त्यांना सव्वा एकरात ६० ते ६५ क्विंटल लसणाचे उत्पादन झाले. लसणाचा दर १०० किलो रुपये आहे. त्यामुळे त्यांना लसूण उत्पादनातून सहा लाख रुपयांचे उत्पन्न होईल. पुरुषोत्तम यांच्या लसूण शेतीची दखल घेत, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष शिरीष धोत्रे आणि कृ. उ. बा. स.चे संचालक प्रकाश पाटील काळे, बबलू वक्टे, राजूभाऊ भुईभार आणि सचिन मोरे यांनी दोनदा शेताला भेट देऊन लसूण शेतीची माहिती घेतली. त्यांचा लसूण शेतीचा उपक्रम तालुक्यातील शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

फोटो:

दरवर्षी नवनवीन प्रयोग शेतीत करतो. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी लसणाचे पीक घेतले. इतर पिकांच्या तुलनेने हे पीक सोपे आहे. या पिकाचा कॅश क्रॉप म्हणून विचार करून व्यवस्थित नियोजन केल्यास भरपूर नफा मिळू शकतो. शेतकऱ्यांनी लसूण शेतीकडे वळावे. - गोपाल पुरुषोत्तम, प्रयोगशील शेतकरी पातूर

Web Title: A huge income of Rs. 6 lakhs taken from a quarter acre farm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.