लोकमत आणि व्हिस्परच्या ‘घे उंच भरारी’ उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:56 AM2017-11-28T00:56:57+5:302017-11-28T01:03:56+5:30

लोकमत  आणि व्हिस्पर चॉइसच्या ‘घे उंच भरारी’ या उपक्रमाद्वारे प्रत्येक आई आणि  मुलीला एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला ज्याद्वारे या नाजूक  विषयावर संवाद साधला गेला. 

Huge response for Lokmat and Whisper's 'Raised Highs' initiative | लोकमत आणि व्हिस्परच्या ‘घे उंच भरारी’ उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद

लोकमत आणि व्हिस्परच्या ‘घे उंच भरारी’ उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद

googlenewsNext
ठळक मुद्देतिने घेतली उंच भरारी ‘व्हिस्पर’बरोबर

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: ‘घे उंच भरारी एक अभिनव उपक्रम’ महाराष्ट्रातील प्रत्येक मुलींसाठी  ज्याने प्रत्येक मुलीला हक्क मिळावा आपल्या आकांक्षाकडे भरारी घेण्याचा.  मासिक पाळीमध्ये घेतली जाणारी काळजी आणि या बद्दलदेखील मुलगी आणि  आईमध्ये मोकळेपणाने संवाद साधला जात नाही. याच अनुषंगाने लोकमत  आणि व्हिस्पर चॉइसच्या ‘घे उंच भरारी’ या उपक्रमाद्वारे प्रत्येक आई आणि  मुलीला एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला ज्याद्वारे या नाजूक  विषयावर संवाद साधला गेला. 
स्थानिक प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला महिलांचा  आणि विशेष करून तरुणींचा प्रचंड प्रतिसाद लाभला यावेळी व्हिस्परच्या प्र ितनिधी कल्याणी बैस तसेच जिल्हा सामाजिक सुरक्षा समिती सदस्य व स्त्रीरोग  तज्ज्ञ डॉ. आशा मिरगे, शासकीय वैद्यकीय विद्यालय अकोल्याच्या स्त्रीरोग  प्रसूती शास्त्र विभागात वरिष्ठ निवासी डॉ. नमिता काळे, आहार तज्ज्ञ डॉ.  वैशाली राठोड व अकोला वाहतूक शाखेच्या दीपाली नारनवरे, अश्‍विनी माने,  पूजा दांडगे, नीता सनके उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजच्या स् पध्रेच्या काळात मासिक पाळीमुळे मुलींची शाळा बुडू नये. यासाठी व्हिस्पर  चॉइस वापरणे किती महत्त्वाचे आहे, हे एव्हीद्वारे दाखविण्यात आले. उपस्थित  महिलांना आपल्या खास शैलीत मार्गदर्शन करताना डॉ. आशा मिरगे यांनी  मासिक पाळीसंबंधी आई आणि मुलगी तसेच एकूणच पारिवारिक वातावरण  कसे हाताळावे याबद्दल अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. या विषयाबद्दल  मुलींच्या मनात भीती आणि अज्ञान असते. त्यामुळे उद्भवणार्‍या समस्यांना  कशा प्रकारे सामोरे जावे, याबद्दल डॉ. मिरगे यांनी सर्मपक मार्गदर्शन केले. डॉ.  नमिता काळे यांनी मासिक पाळीदरम्यान होणार्‍या हार्मोनल व शारीरिक बदल  या विषयावर महिलांच्या शंकांचे निरसन केले, तसेच डॉ. वैशाली राठोड यांनी  या वयात साभाळायच्या आहारपद्धतीवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे वाहतूक शाखेच्या दीपाली नारनवरे व त्यांच्या चमूने या काळात त्यांना ये त असलेल्या समस्यांना कशा प्रकारे कुठलाही न्यूनगंड न बाळगता हाताळता  याबद्दल मार्गदर्शन करत उपस्थित मुलींनाही या काळात आत्मविश्‍वासाने आपली  सर्व कामे अगदी नेहमीप्रमाणे सहजतेने करू शकतात, असे प्रतिपादन केले. 
यावेळी शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी मोठय़ा प्रमाणात उपस्थित होत्या.  मासिक पाळीदरम्यान पॅड कसे वापरावेत, कशा प्रकारची काळजी घ्यावी,  याबद्दल कल्याणी बैस यांनी उपस्थितांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.  आलेल्या महिलांना हा उपक्रम खूपच मार्गदर्शक वाटला. पॅडमुळे आपल्या  मुलीची शाळा चुकणार नाही व तिच्या स्वप्नांना भरारी मिळण्यास नक्कीच मदत  होईल, यावर सर्वांचे एकमत झाले व असा स्तुत्य उपक्रम घेतल्याबद्दल  आयोजकांचे आभार मानले.

स्पर्धेतील विजेते
कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये मुलींनी उत्स्फूर्त सहभाग  नोंदविला. दोरीवरच्या उड्या, अगरबत्ती लावणे व फुगडी अशा स्पर्धांमधून  िप्रया बुंदले व शिवानी गावंडे या विजेत्या ठरल्या. मान्यवरांच्या हस्ते त्यांना  बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

Web Title: Huge response for Lokmat and Whisper's 'Raised Highs' initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.