अकोल्यातील राष्ट्रीय अधिवेशनात शेकडो लेखापाल विद्यार्थ्यांची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 02:12 PM2019-12-18T14:12:58+5:302019-12-18T14:13:22+5:30
देशभरातून आलेल्या जवळपास साडेचारशे लेखापाल विद्यार्थ्यांनी या अधिवेशनास हजेरी लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : लेखापाल विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही. सीए होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे जीवन सामान्य असू शकत नाही, असे प्रतिपादन बोर्ड आॅफ स्टडीजचे उपाध्यक्ष दुर्गेश काबरा यांनी केले. इन्सिट्युट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडिया, अकोला आणि वेस्टर्न इंडिया सिटी स्टुडंट्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सनदी लेखापाल विद्यार्थ्यांचे द्विदिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन मंगळवारी सकाळी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात थाटात झाले. देशभरातून आलेल्या जवळपास साडेचारशे लेखापाल विद्यार्थ्यांनी या अधिवेशनास हजेरी लावली.
दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात बोर्ड आॅफ स्टडीजचे उपाध्यक्ष दुर्गेश काबरा उद्घाटक म्हणून आणि प्रमुख अतिथी म्हणून डब्ल्यूआयआरसीच्या प्रीती सावला, डब्ल्यूआयसीएसचे जयेश काला, स्थानीय शाखेचे अध्यक्ष दीपक अग्रवाल, उपाध्यक्ष जलज बाहेती, सी.व्ही. चितळे, आयसीएआयच्या सेंट्रल कौन्सिल सदस्य दिल्ली येथील राजेश शर्मा, डब्ल्यूआयसीएएसएचे उपाध्यक्ष हर्ष नावंदर, सचिव दीपक शर्मा, मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.
या अधिवेशनाच्या निमित्ताने देशभरातील तज्ज्ञ सीए आणि अर्थविषयक गाढे अभ्यासक अकोल्यात दाखल झाले आहेत.
दोन दिवस चालणाºया अधिवेशनात नागपूरचे अभिजित केळकर, वडोदराचे विशाल जोशी, मुंबईचे अर्पित काबरा, ठाण्याचे मंगेश किनारे, नागपूरचे कमलकिशोर राठी, औरंगाबादचे उमेश शर्मा, मुंबईचे प्रणय कोचर, पुण्याच्या अंकिता बोरा, आनंद जाखोटिया विशेष व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करीत आहे. त्यानिमित्ताने या अधिवेशनात १५ विद्यार्थी विविध राष्ट्रीय विषयांवर पेपर सादर करीत आहे. कंपनी कायदे, जीएसटी, आयकर, माहिती तंत्रज्ञान व आॅडिटिंग या विषयावर तांत्रिक सत्र लेखापाल विद्यार्थ्यांसाठी मोलाचे ठरत आहे.
राष्ट्रीय अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी सनदी लेखापालचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.