पातूर तालुक्यातील शेकडो कुटुंबांचे रसवंती व्यवसायासाठी गुजरात, राजस्थानमध्ये स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:11 AM2021-02-05T06:11:56+5:302021-02-05T06:11:56+5:30

पातूर : गतवर्षी कोरोना महामारीमुळे गावांकडे परतलेली शेकडो कुटुंबांनी रसवंतीचा व्यवसाय करण्यासाठी गुजरात, राजस्थान राज्यात स्थलांतर करण्यास सुरुवात केली ...

Hundreds of families from Pathur taluka migrated to Gujarat, Rajasthan for Raswanti business | पातूर तालुक्यातील शेकडो कुटुंबांचे रसवंती व्यवसायासाठी गुजरात, राजस्थानमध्ये स्थलांतर

पातूर तालुक्यातील शेकडो कुटुंबांचे रसवंती व्यवसायासाठी गुजरात, राजस्थानमध्ये स्थलांतर

Next

पातूर : गतवर्षी कोरोना महामारीमुळे गावांकडे परतलेली शेकडो कुटुंबांनी रसवंतीचा व्यवसाय करण्यासाठी गुजरात, राजस्थान राज्यात स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. तीन महिने परप्रांतात राहून, ही कुटुंबे गावी परततात.

पातूर तालुक्यातील शेकडो कुटुंबे गुजरात राज्यातील शहरासह ग्रामीण भागात जाऊन रसवंतीचा व्यवसाय करतात. लगतच्या राजस्थान राज्यामध्ये रसवंतीचा व्यवसाय करण्याकरिता शिर्ला, देऊळगाव, बाभूळगाव, जांभरून, पातूरसह अनेक गावांतील कुटुंबे रसवंतीचा व्यवसाय करण्याकरिता शेकडो मैलांचा प्रवास करून रोजगाराच्या शोधात जातात.

केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा गाव, खेड्यातील शेतकरी, शेतमजुरांना लाभ मिळत नाही. लोकांच्या हाताला रोजगार नाही. त्यामुळे दोन वेळची भ्रांत सतावते. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रभाव कमी झाला. तसेच कोरोनाची लस उपलब्ध झाल्यामुळे आता तालुक्यातील ही कुटुंबे परप्रांताकडे निघाली आहेत. कोरोनामुळे या कुटुंबांना गावी परतावे लागले होते. कोरोना काळात रोजगार नसल्याने, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. आता मात्र, रोजगारासाठी परप्रांतात जाण्यासाठी हे व्यावसायिक सज्ज झाले आहेत.

फोटो:

Web Title: Hundreds of families from Pathur taluka migrated to Gujarat, Rajasthan for Raswanti business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.