चोरट्यांकडून दीड लाखांचे दागिने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:31 AM2017-09-25T01:31:31+5:302017-09-25T01:32:52+5:30
अकोला : आदर्श कॉलनीमधील एका घरात मुक्कामी राहून ३.५0 लाख रुपयांच्या चोरी प्रकरणात खदान पोलिसांनी आंध्र प्रदेशातून दोन चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून रविवारी तब्बल दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही चोरट्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क

खदान पोलीस स्टेशन हद्दीतील आदर्श कॉलनीमध्ये चंचल शर्मा यांच्याकडे २ सप्टेंबर रोजी २ लाख ९0 हजार रुपये रोख रकमेसह दागिन्यांची चोरी झाली होती. यामध्ये चोरट्यांनी एकूण ३ लाख ७0 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. खदान पोलिसांनी आंध्र प्रदेशातील रामकृष्ण आप्पाराव कुसला (४५), नागराज इरन्ना वड्डे (३0) दोघेही राहणार अडोणी, जिल्हा कुरुनुली, आंध्र प्रदेश यांना शनिवारी अटक केली. या दोघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या दोघांकडून दीड लाख रु पयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती ठाणेदार संतोष महल्ले यांनी दिली.