एमपीएससी परीक्षेला हजारांवर विद्यार्थी गैरहजर
By admin | Published: February 2, 2015 01:39 AM2015-02-02T01:39:02+5:302015-02-02T01:39:02+5:30
अकोल्यातील ३६ केंद्रांवर ६ हजार ४४६ उमेदवारांनी दिली परीक्षा.
अकोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षा रविवार,१ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. अकोल्यातील ३६ केंद्रांवर ६ हजार ४४६ उमेदवारांनी परीक्षा दिली, १ हजार ४0४ उमेदवार गैरहजर होते.
रविवारी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत अकोला शहरातील ३६ केंद्रांवर एमपीएससीची परीक्षा घेण्यात आली.
जिल्ह्यातील ७ हजार ८५0 विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट होते. त्यापैकी ६ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. उर्वरित १ हजार ४0४ विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर राहिले.
परीक्षेच्या संचालनासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ३६ केंद्रप्रमुख, ४0१ समवेक्षक, १३0 पर्यवेक्षक, सात समन्वय अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली होती. परीक्षा केंद्र परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शांततापूर्ण वातावरणात परीक्षा पार पडली. परीक्षेदरम्यान सर्वच केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.