देवळीतील उपोषण अधिकार्यांच्या मध्यस्थीने सुटले
By Admin | Published: April 21, 2017 06:41 PM2017-04-21T18:41:37+5:302017-04-21T18:41:37+5:30
सदर उपोषण अखेर पाचव्या दिवशी बोरगाव मंजूचे ठाणेदार पी.के. काटकर यांनी पुढाकार घेतल्यानंतर संबंधित अधिकार्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सुटले.
बोरगांव मंजू : जनतेच्या विविध विभागाकडे प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करून न्याय द्यावा, याकरिता परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी १७ एप्रिलपासून नजीकच्या देवळी येथे सामूहिक बेमुदत उपोषणास प्रारंभ केला होता. सदर उपोषण अखेर पाचव्या दिवशी बोरगाव मंजूचे ठाणेदार पी.के. काटकर यांनी पुढाकार घेतल्यानंतर संबंधित अधिकार्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सुटले.
येथील देवानंद सदांशिव, दिलीप खरबडकार, अयाजमिया देशमुख, प्रकाश चक्रनारायण, समाधान पंडित, अंबादास वसू यांनी पातूर-नंदापूर गावातील रस्त्यावरील अतिक्रमणामुळे गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली पातूर-नंदापूर ते कानडी बससेवा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घ्यावा, पातूर-नदापुर ते कवळा शेत रस्ता बांधकाम करणार्या मजुरांची मजुरी त्वरित अदा करून उर्वरित शेत रस्त्याचे बांधकाम पूर्ण करावे, अन्वी मिर्झापूर येथील घरकुलाच्या बांधकामाकरिता धनादेश अदा केल्याप्रकरणी सर्व दोषींवर प्रशासनाकडून कठोर कारवाई व्हावी, देवळी येथे वन विभागाने डमी मजूर दाखवून पैसे हडपल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते. हे उपोषण तीन दिवसांपासून सुरू असूनही कुणीच दखल घेतली नव्हती. त्यामुळे ह्यलोकमतह्णने २0 एप्रिलच्या अंकात याबाबतची बातमी ह्यविविध मागण्यांसाठी सामूहिक उपोषण सुरूच!ह्ण या शीर्षकाखाली प्रकाशित केली होती. अखेर २१ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता बोरगाव मंजू ठाणेदार पी.के. काटकर, अकोला पंचायत समिती गटविकास अधिकारी गजानन वेले, निवासी नायब तहसीलदार वाय.आर. हातेकर, विस्तार अधिकारी आर.के. देशमुख, ग्रामसेवक विलास जाधव, तलाठी डी.यू. गावंडे, पातूर-नंदापूर भगवान गवळी यांनी संबंधित उपोषण करणार्या कार्यकर्त्यांच्या समस्या व प्रश्न लवकर १५ दिवसांत मार्गी लावण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर उपोषणकर्त्यांना शरबत पाजून सामूहिक उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी ग्राहक मंचच्या जिल्हाध्यक्ष टिना देशमुख, ज्ञानदेव शेगोकार, विद्या जवके, प्रहार संघटनेचे सिद्धार्थ सदाशिव, खासगी डॉक्टर काकड, धुळधर हे उपस्थित होते. (वार्ताहर)