जेवण उशिरा दिल्याने पत्नीवर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 10:11 AM2020-06-23T10:11:49+5:302020-06-23T10:14:12+5:30

राजेश वानखडे या इसमाने त्याची पत्नी अलका यांच्यासोबत जेवण उशिरा देत असल्याच्या कारणावरून सोमवारी दुपारी वाद घातला.

Husband stabbed his wife for giving food late | जेवण उशिरा दिल्याने पत्नीवर चाकूहल्ला

जेवण उशिरा दिल्याने पत्नीवर चाकूहल्ला

Next
ठळक मुद्देपोलिसांनी महिलेला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पती राजेश वानखडे याला ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील डॉ. पंजाबराव कृषी देशमुख विद्यापीठात परिसरातील रहिवासी असलेल्या एका पतीने पत्नी स्वयंपाक उशिरा करून जेवण देण्यास वेळ करते या कारणावरून संतप्त होत पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. महिला गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. महिलेची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे.
डॉ. पंजाबराव कृषी देशमुख विद्यापीठातील कॉर्टरमध्ये रहिवासी असलेल्या राजेश वानखडे या इसमाने त्याची पत्नी अलका यांच्यासोबत जेवण उशिरा देत असल्याच्या कारणावरून सोमवारी दुपारी वाद घातला.
या वादात पत्नीने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता संतप्त झालेल्या राजेश वानखडे याने त्याची पत्नी अलका यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर गंभीर जखमी असलेली महिला घराच्या बाहेर येताच याच वेळी बोरगाव मंजू पोलिसांचे वाहन राष्ट्रीय महामार्गावरून जात होते. त्यांना हा प्रकार दिसताच पोलिसांनी महिलेला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून तिचा पती राजेश वानखडे याला ताब्यात घेतले. पत्नी जेवण वेळेवर देत नसल्याच्या कारणावरून पत्नीवर हल्ला केल्याची कबुली आरोपीने बोरगाव मंजू पोलिसांसमोर दिली. सदर घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने बोरगाव पोलिसांनी सदर आरोपीस एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी महिलेचे बयान घेतल्यानंतर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली.

Web Title: Husband stabbed his wife for giving food late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.