पतीच्या हत्याकांडातील पत्नी अन् सासूची निर्दोष निर्दोष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 02:37 PM2019-04-10T14:37:32+5:302019-04-10T14:37:32+5:30

अकोला : शिवणीतील राहुल नगरमध्ये रहिवासी असलेल्या पत्नीने प्रियकर आणि सासूच्या मदतीने तिच्या पतीचा खून केला होता. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचाही प्रयत्न या तिघांनी केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने पत्नी, सासू आणि मृतकाच्या पत्नीचा प्रियकर या तिघांची मंगळवारी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

Husband's murderer wife and mother in law acquitted |   पतीच्या हत्याकांडातील पत्नी अन् सासूची निर्दोष निर्दोष मुक्तता

  पतीच्या हत्याकांडातील पत्नी अन् सासूची निर्दोष निर्दोष मुक्तता

Next

अकोला : शिवणीतील राहुल नगरमध्ये रहिवासी असलेल्या पत्नीने प्रियकर आणि सासूच्या मदतीने तिच्या पतीचा खून केला होता. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचाही प्रयत्न या तिघांनी केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने पत्नी, सासू आणि मृतकाच्या पत्नीचा प्रियकर या तिघांची मंगळवारी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
शिवणीतील रहिवासी सचिन नाजूकराव भटकर याची पत्नी सारिकाचे अनैतिक संबंध असल्याची माहिती त्याला मिळाली होती. त्यामुळे पत्नीच्या या प्रकाराला विरोध केल्यामुळे पत्नीने तिचा प्रियकर विजय काशीराम नरवाडे आणि सासू चंदा नाजूकराव भटकर या तिघांनी १५ मार्च २०१५ रोजी रात्री १२ वाजताच्या दरम्यान सचिन भटकरचा खून केला होता. खुनाचे पुरावे मिटविण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्नही या तीन आरोपींनी केले होते. या प्रकरणाची तक्रार मृतकाचा भाऊ शरद नाजूकराव भटकर यांनी १६ मार्च २०१५ रोजी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी तीनही आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, १२० ब, २०१, ४९७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयात मंगळवारी झाली. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आणि सबळ पुराव्याअभावी प्रकरणातील तीनही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

Web Title: Husband's murderer wife and mother in law acquitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.