मनपाच्या हायड्रंटवरून पाण्याची चोरी व विक्री!

By admin | Published: May 25, 2014 12:33 AM2014-05-25T00:33:18+5:302014-05-25T00:48:11+5:30

अकोला महापालिकेच्या हायड्रंटवरून बिनधास्तपणे पाण्याची चोरी व विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे.

Hydrant on theft and sale of water! | मनपाच्या हायड्रंटवरून पाण्याची चोरी व विक्री!

मनपाच्या हायड्रंटवरून पाण्याची चोरी व विक्री!

Next

आशिष गावंडे/अकोला

शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा पाण्याची विक्री करणार्‍या टोळीच्या पथ्यावर पडला आहे. महाराणा प्रताप बागेसमोरील महापालिकेच्या हायड्रंटवरून बिनधास्तपणे पाण्याची चोरी व विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. हायड्रंटवरून पाण्याचा नेमका किती उपसा होतो, याचा कोणताही ताळमेळ अथवा लेखाजोखा ठेवला जात नसल्याचे धक्कादायक वास्तव शनिवारी ह्यलोकमतह्णच्या पाहणीत समोर आले. ऐन उन्हाळ्य़ात महापालिका व नगरसेवकांच्या उदासीनपणामुळे अकोलेकरांना तीव्र पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. उन्हाळ्य़ाच्या पृष्ठभूमीवर प्रशासनाने पाणीटंचाई निवारणाची कोणतीही पूर्वतयारी केली नाही, तर नगरसेवकांनीसुद्धा प्रशासनाला सूचना केल्याचे ऐकीवात नाही. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील ६५ एमएलडी प्लांटवरील पाचपैकी चार पम्पिंग मशीन कालबाह्य झाल्याने त्यामध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत आहे. त्यात भरीसभर मुख्य जलवाहिनी फुटत असल्याने पाणीपुरवठय़ाच्या समस्येत वाढ झाली आहे. या सर्व बाबी पाण्याचा गोरखधंदा करणार्‍यांच्या पथ्यावर पडल्या आहेत. ह्यस्लम एरियाह्ण व नवीन वस्त्यांमधील नागरिकांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेत, पाण्याची खुलेआम विक्री सुरू आहे. महाराणा प्रताप बागेसमोरील मनपाच्या हायड्रंटवरून अवघ्या १00 रुपयांत टॅँकरचालकांना पाणी दिले जाते. परंतु याबदल्यात संबंधित टॅँकरचालक नागरिकांजवळून तब्बल ७00 ते ९00 रुपये वसूल करीत आहेत. विशेष म्हणजे, हायड्रंटवर कार्यरत कर्मचारी पाण्याचा हिशेब ठेवण्यासाठी पावती बुकसह साध्या वहीचा वापर करीत असल्याचे समोर आले. यामुळे दररोज किती पावत्यांच्या मोबदल्यात पाणी दिले जाते, याचा हिशेबच नसल्याचे दिसून आले.

Web Title: Hydrant on theft and sale of water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.