मी नरेंद्र मोदी बोलतोय... जिल्हा संघचालकांना मोदींनी स्वत:हून केला होता फोन

By admin | Published: May 26, 2014 09:28 PM2014-05-26T21:28:33+5:302014-05-27T19:21:42+5:30

नमस्कार...संघचालकजी, मी गुजरातचा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी बोलतोय...अशा शब्दात देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेले नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून जिल्हा संघचालकांना फोन केला आणि अकोला अर्बन बँकेच्या नूतन वास्तू लोकार्पण कार्यक्रमाला येत असल्याचे सांगितले. एवढी विनम्रता आणि निष्ठा पाहून जिल्हा संघचालक भारावून गेले होते.

I am speaking Narendra Modi ... Modi had himself organized the District Factors | मी नरेंद्र मोदी बोलतोय... जिल्हा संघचालकांना मोदींनी स्वत:हून केला होता फोन

मी नरेंद्र मोदी बोलतोय... जिल्हा संघचालकांना मोदींनी स्वत:हून केला होता फोन

Next

अकोला: नमस्कार...संघचालकजी, मी गुजरातचा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी बोलतोय...अशा शब्दात देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेले नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून जिल्हा संघचालकांना फोन केला आणि अकोला अर्बन बँकेच्या नूतन वास्तू लोकार्पण कार्यक्रमाला येत असल्याचे सांगितले. एवढी विनम्रता आणि निष्ठा पाहून जिल्हा संघचालक भारावून गेले होते. एका राज्याचा मुख्यमंत्री स्वत:हून फोन करतो. ही बाब निश्चितच आनंददायी होती. एक मुख्यमंत्री म्हणून नाही तर संघ स्वयंसेवक म्हणून केलेला हा फोन होता. सोमवारी सायंकाळी नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांनी केलेल्या फोनच्या आठवणीला या निमित्ताने उजाळा मिळाला.
२00३ सालची घटना आहे. अकोला अर्बन बँकेच्या नूतन वास्तू लोकार्पण सोहळ्याला कोणत्या प्रमुख पाहुण्यांना निमंत्रित करावे, याविषयी बँकेचे संचालक आणि संघाच्या ज्येष्ठ पदाधिकार्‍यांमध्ये चर्चा झाली. त्यावेळचे रा.स्व. संघाचे प्रांत प्रचारक रवी भुसारी यांच्या कानावर ही बाब गेली. त्यांनी संघाचे तत्कालीन सरसंघचालक के. सुदर्शन यांचे आणि नरेंद्र मोदी यांचे नाव सुचविले; परंतु मोदींशी संपर्क साधणार कोण? याची जबाबदारी रवी भुसारी यांनी घेतली. त्यांनीच नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधून त्यांना बँकेच्या वास्तू लोकार्पण सोहळ्याला येण्यासाठी वेळ मागितली आणि त्यावेळचे जिल्हा संघचालक आणि बँकेचे अध्यक्ष ॲड. दादा देशपांडे यांना तुम्हाला फोन करायला सांगतो असे सांगितले. त्यावर नरेंद्र मोदी यांनी वो संघचालकजी है। मैं ही उन्हीको फोन करूंगा असे म्हटले आणि काही वेळानंतर मोदींनी स्वत:हून ॲड. दादा देशपांडे यांना फोन केला आणि त्यांना मी गुजरातचा मुख्यमंत्री...नरेंद्र मोदी बोलतोय...बँकेच्या वास्तू लोकार्पण सोहळ्याला येणार असल्याचे सांगितले आणि त्यांचीही आस्थेने चौकशी केली. एवढी मोठी जबाबदारी सांभाळणार्‍या मोदींनी आपल्याला स्वत:हून फोन केला याचे दादांना अप्रुप वाटत होते आणि अभिमानही. या घटनेवरून मोदींची संघाप्रती असलेली निष्ठा, समर्पण प्रतीत होते. ३ डिसेंबर २00३ रोजी नरेंद्र मोदी सकाळी विमानाने अकोल्यात आले. वास्तूचे लोकार्पण त्यांनी केले. हा नेत्रदीपक सोहळा अद्यापही अकोलेकरांच्या कायम स्मरणात आहे.

Web Title: I am speaking Narendra Modi ... Modi had himself organized the District Factors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.