‘मी देशाचा जलरक्षक...’ जल दिनानिमित्त घेतली जलशपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:20 AM2021-03-23T04:20:06+5:302021-03-23T04:20:06+5:30
यानिमित्ताने २२ मार्च ते २७ मार्च या कालावधीत जल सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहामध्ये प्रत्येकाने ...
यानिमित्ताने २२ मार्च ते २७ मार्च या कालावधीत जल सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहामध्ये प्रत्येकाने पाण्याचे मूल्य जाणून घेऊन त्याच्या संवर्धनासाठी व जपण्यासाठी प्रयत्न करावेत या हेतूने ही शपथ घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विद्या पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता राजीव फडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन सुरज गोहाड, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, कृषी विकास अधिकारी मुरलीधर इंगळे, कार्यकारी अभियंता खान, शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांच्यासह इतर विभागप्रमुख उपस्थित होते.
आजच्या या जल शपथ कार्यक्रमांमध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके, राजेंद्र भटकर, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश डहाके, अर्चना डोंगरे, एम आय एस सल्लागार राहुल गोडले, अभियांत्रिकी तज्ज्ञ सागर टाकळे, एचआरडी सल्लागार प्रवीण पाचपोर पाणी गुणवत्ता सल्लागार ममता गनोदे, लेखापाल प्रल्हाद पाखरे, श्रीकांत जगताप आदी उपस्थित होते. जलशपथचे वाचन राजेश डहाके यांनी केले.
जिल्हाभरात पार पडला कार्यक्रम
आजच्या जल दिनानिमित्त जिल्हाभरात ग्रामपंचायत, पंचायत समिती, गाव व इतर शासकीय कार्यालयांमध्ये जल शपथ घेण्यात आली. यामध्ये मी देशाचा जलरक्षक म्हणून कार्यरत राहील अशी शपथ या कार्यक्रमात सहभागी व्यक्तीने घेतली.