शिक्षकाची नोकरी नको रे बाबा, डी.एड.कडे विद्यार्थ्यांची पाठ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:20 AM2021-09-11T04:20:13+5:302021-09-11T04:20:13+5:30
जिल्ह्यातील डीएड कॉलेज- ०८ एकूण जागा- ३२० आलेले अर्ज- २४० नोकरीची हमी नाही! एकेकाळी डीएड केलेला विद्यार्थी नोकरीविना राहत ...
जिल्ह्यातील डीएड कॉलेज- ०८
एकूण जागा- ३२०
आलेले अर्ज- २४०
नोकरीची हमी नाही!
एकेकाळी डीएड केलेला विद्यार्थी नोकरीविना राहत नव्हता. परंतु आता शासनाने शिक्षक भरती बंद केली. त्यामुळे डीएड करून नोकरी मिळणार नाही. असे विद्यार्थ्यांना वाटत असल्यामुळे ते इतर अभ्यासक्रमांकडे वळले आहेत. पूर्वी डी.एड. प्रवेशासाठी रांगा लागायच्या. गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश व्हायचे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आता विद्यार्थी अभियांत्रिकी, मेडिकलसह आयटीआय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळले आहे.
प्राचार्य म्हणतात...
शिक्षक भरती बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांनी डी.एड.कडे पाठ फिरविली. हे खरे असले तरी, यंदा शिक्षक भरती होत आहे. टीईटीची परीक्षा घेण्यात येत आहे. येत्या काळात ४० हजार शिक्षकांची भरती होणार असल्याने, डी.एड.कडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. लवकरच डी.एड.लासुद्धा सुगीचे दिवस येतील.
-विजय अग्रवाल, प्राचार्य श्री दत्तगुरू अध्यापक विद्यालय, खडकी
फोटो:
आता शासनाने टीईटी, पवित्र पोर्टल सुरू केले. त्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू केली. डीएडच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही टीईटी परीक्षा देता येते. त्यामुळे आता परिस्थिती बदलत आहे. विद्यार्थ्यांचा डीएडकडे कल वाढत आहे. हळूहळू परिस्थिती बदलत आहे.
-दीपक गव्हाळ, प्राचार्य भाऊसाहेब बिरकड अध्यापक विद्यालय
फोटो:
डी.एड. अभ्यासक्रम करूनही नोकरीची हमी नाही. टीईटी परीक्षा दिल्यानंतरही नोकरीसाठी डोनेशन द्यावे लागते. कोणत्याच क्षेत्रात विनाडोनेशन नोकरी मिळत नाही. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले. नोकरी नाहीतर व्यवसाय तरी करता आला पाहिजे.
-राहुल घुगरे, विद्यार्थी
आता डी.एड.ला पूर्वीसारखे महत्त्व राहिले नाही. नोकरी मिळत नाही. डीएड करूनही खासगी शाळांमध्ये मानधनावर काम करावे लागते. त्यापेक्षा आयटीआयटी, फॅशन डिझायनिंग व इतर कोर्सेस करून रोजगार मिळविता येऊ शकतो.
-अश्विनी बोरकुटे, विद्यार्थिनी