साखरेपेक्षा गुळच खातोय भाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:14 AM2021-06-25T04:14:49+5:302021-06-25T04:14:49+5:30
गुळाचा चहा बनले स्टेटस चहाला आता सेंद्रिय गुळाची गोडी लागली असून, गुळाच्या चहाची मागणी वाढू लागली असल्याचे चित्र दिसत ...
गुळाचा चहा बनले स्टेटस
चहाला आता सेंद्रिय गुळाची गोडी लागली असून, गुळाच्या चहाची मागणी वाढू लागली असल्याचे चित्र दिसत आहे.
गुळाचा चहा आरोग्यासाठी अतिशय चांगला मानला जात असल्याने नागरिकांचा याकडे अधिक कल वाढत आहे.
नव्वदीच्या काळात गुळाला मोठी मागणी होती. मध्यंतरीच्या काळात गुळाची मागणी घटली; परंतु आता पुन्हा मागणी वाढत आहे.
सध्या शहरात गुळाच्या चहाचे फॅड सुरू झाले आहे. पाहुणे मंडळींना साखरेऐवजी गुळाचा चहा बनवून पाजल्या जात आहे.
गावात मात्र साखरच!
गावात पाहिजे त्या प्रमाणात गुळाची मागणी नाही. केवळ सणाला गुळाची मागणी होते. इतर वेळेस साखरच वापरली जाते.
- मनोज गवई, दुकानदार.
शहरात साखरेपेक्षा गुळालाच मागणी
काही वर्षांआधी गुळाची मागणी केवळ सणाला होत होती; मात्र आता मोठ्या प्रमाणात गुळाची मागणी होत आहे. काढा, चहासाठी गुळाचा वापर वाढला आहे.
- किशोर साबळे, व्यापारी.
गुळाला आता चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहे, तसेच सध्या बाजारातही गुळाला चांगला भाव आला आहे. ग्राहकांकडून मागणीही वाढली आहे.
- ईश्वर पाटील, व्यापारी.
असा वाढला गुळाचा भाव (प्रती किलो दर)
२००० २००५ २०१० २०२० २०२१
साखर १२ २० २१ ५० ५५
गुळ १२ १३ १७ ३४ ३५
गुळ हा पोटाच्या पचनक्रियेसाठी चांगला आहे. साखरच्या जागी गुळ वापरल्यास बहुतांश रोग दूर राहतात. प्रत्येकाने आहारात गुळाचा उपयोग करावा.
- मुक्ती बगडीया, आहार तज्ज्ञ.