म्हणजे आम्ही जे सांगितले ते खाेटे आहे का; स्वपक्षीयांच्या प्रश्नांकडे सभापतींनी केले दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:24 AM2021-09-15T04:24:24+5:302021-09-15T04:24:24+5:30
मनपाच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची प्रशासनाने राेखलेली वेतनवाढ पुन्हा बहाल करण्याच्या विषयावर स्थायी समितीच्या सभेत भाजपमध्येच अंतर्गत मतभेद व एकवाक्यता नसल्याचे ...
मनपाच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची प्रशासनाने राेखलेली वेतनवाढ पुन्हा बहाल करण्याच्या विषयावर स्थायी समितीच्या सभेत भाजपमध्येच अंतर्गत मतभेद व एकवाक्यता नसल्याचे दिसून आले. या विषयाची टिप्पणी सदस्यांना का देण्यात आली नाही, असा सवाल राजेश मिश्रा यांनी उपस्थित केला. निधी उपलब्ध नव्हता, तर घाेळ झालाच कसा, असा प्रश्न काँग्रेस नगरसेवक माेहम्मद इरफान यांनी विचारला. दरम्यान, निधी उपलब्ध नसताना सायकल खरेदीचा खटाटाेप कशासाठी, काही मुख्याध्यापकांनी सायकल खरेदीची खाेटी देयके का सादर केली, असे विचारत ज्या मुख्याध्यापकांनी स्वत:च्या खिशातील पैसे देऊन सायकल खरेदी केल्या, त्यांना तातडीने पैसे परत करण्याचा प्रस्ताव सतीश ढगे यांनी मांडला. तसेच बनावट व खाेटी देयके सादर करणाऱ्या मुख्याध्यापकांची वेतनवाढ राेखण्याचे मत त्यांनी मांडले.
सभापतींच्या मंजुरीवर आक्षेप
सतीश ढगे यांच्या वक्तव्याशी सहमत असल्याचे राजेश मिश्रा यांनी सांगितल्यानंतर सभापती संजय बडाेणे यांनी केवळ २८ मुख्याध्यापकांच्या संदर्भात विषयाचे वाचन करणे अपेक्षित हाेते. तसे न करता त्यांनी घाईघाईत इतरही काही विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांची राेखलेली वेतनवाढ अदा करण्याचे निर्देश दिले. त्यावर ढगे यांनी तीव्र संताप व्यक्त करीत आक्षेप घेतला.
...तर प्रशासन अडचणीत येईल!
सायकल खरेदीच्या खाेट्या पावत्या सादर करणाऱ्या काही मुख्याध्यापकांची व त्यांच्याआडून काही विभागप्रमुखांची वेतनवाढ अदा करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास प्रशासन अडचणीत येईल, असा गर्भित इशारा राजेश मिश्रा यांनी दिला. त्यावर ठराव प्राप्त झाल्यानंतर याेग्य निर्णय घेऊ, असे उपायुक्त पंकज जावळे यांनी स्पष्ट केले.