आयआयटीच्या कोविड किटला ‘आयसीएमआर’ची मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 06:21 PM2020-07-15T18:21:53+5:302020-07-15T18:22:15+5:30
या किटला भारतीय संशोधन परिषदेची (कउटफ) मान्यता दिली आहे
अकोला: कोविड रुग्णांची तपासणी करण्यासाठी कमी खर्चाची कोविड चाचणी किट आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी तयार केली आहे. या किटला भारतीय संशोधन परिषदेची (कउटफ) मान्यता दिली आहे. या कोविड किटचे लोकार्पण केंद्रीय मानव संसाधन मंत्री रमेश पोखरीवाल निशंक तर केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी बुधवारी अकोला येथून आॅनलाइन केले.
या किटबद्दल ना. संजय धोत्रे यांनी माहिती देताना सांगितले की, कोविड-१९ चा फैलाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचे कोविड चाचणी व तपासणी होणे गरजेचे आहे. यासाठी आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी कोविड किट तयार केली असून, याची किंमत फक्त ३९९ रुपये आहे. याला लागणारा इतर खर्च मिळून या किटची किंमत फक्त ६५० रुपये होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कोविड टेस्ट होऊन कोविड संक्रमणाच्या फैलावावर प्रतिबंध होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. या चाचणी किटसाठी की, कोरोश्योर या कंपनीसह सहा कंपन्यांनी लायसन्स घेतले असून, या कंपन्यानी एक लाख किटचा मागे पाच हजार किट शासनाला मोफत देण्याचे अभिवाचन दिले आहे, असेही धोत्रे यांनी सांगितले. शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नामुळे ही किट निर्धारित वेळेत तयार झाली असून, हे एक क्रांतिकारी काम असल्याचे त्यांनी स्प्ष्ट करत सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. नागरिकांनी पुढे येऊन आपल्या कोविडबाबतच्या चाचण्या करून घ्याव्या, असे आवाहनही ना. धोत्रे यावेळी केले.